Maharashtra

घुमावल बु! येथील वर पित्याने लग्नात आहेर म्हणुन दिले वृक्षाची रोपे भेट

घुमावल बु!  येथील  वर पित्याने  लग्नात आहेर म्हणुन दिले वृक्षाची रोपे भेट

घुमावल बु! येथील वर पित्याने लग्नात आहेर म्हणुन दिले वृक्षाची रोपे भेट

 चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
घुमावल बु! येथील शेतकरी,शेतमजुर श्री.गुरूदास व्यंकट वाघ  यांचे जेष्ठ चिरंजीव विक्की यांचा सावरखेडा तालुका पारोळा येथील श्री.छोटू संभाजी सरदार यांची कन्या कृ.रोशनी हिच्याशी काल दिनांक- 14/7/2019 रोजी  चोपडा येथे विवाह  संपन्न झाला. 
        पर्यावरणात झाडांचे महत्त्व लक्षात आनुदेण्या साठी आणि समतोल बिघडलेल्या पर्यावरणात  वृक्षाची लागवड व्हावी यासाठी विवाहात उपस्थितांना आहेर म्हणुन 1000.(एक हजार) निंबाच्या  झाडांची रोपे भेट म्हणुन देण्यात आली. एवढेच नव्हे तर  रोप  लागवड स्थळा पर्यत सुरक्षित नेता यावे यासाठी पर्यावरण पुरक सुती कापडाच्या पिशवी वर पर्यावरणाचा संदेश देत उपस्थित नातेवाईकांना  अनिष्ठ रूढी परंपरांना फाटा देत प्रत्येकी एक  झाडांची रोप  आहेर म्हणुन भेट दिले.श्री. गुरूदास वाघ यांच्या या स्तुत्ये उपक्रमाचे मा.अरूणभाई गुजराथी आणि उपस्थितांनी खुप कौतुक केले.
     पर्यावरणात दिवसेंदिवस झाडांची कमी होणारी संख्या या मुळे तापमानात होणारी  उच्चांकी वाढ तसेच  पाऊसाची अनिमीयत्ता हे लक्षात घेता जास्त जास्त झाडाची लागवड व्हावी यासाठी “समृद्ध ” पर्यावरणाचा संदेश देणारे उपक्रम आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच मा. श्री. वसंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आम्ही ग्रामस्थांनी हाती घेतला आहे. 
 अशी प्रतिक्रिया  श्री.गुरूदास वाघ यांनी व्यक्त केली. 
      या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा अध्यक्ष मा.अरूणभाई गुजराथी,मा.आमदार मा.कैलास पाटील, पंचायत समिती सभापती आत्माराम महाडके,जिल्हा परिषदेचे सदस्य गजेद्र सोनवणे घुमावल बु!चे लोक नियुक्त सरपंच 
श्री वसंतराव पाटील आणि नातेवाईक  मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button