Amalner

अमळनेर: संगणक परीचालकांचे विविध मागण्यांसाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन…

अमळनेर: संगणक परीचालकांचे विविध मागण्यांसाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन…

अमळनेर गाव पातळीवर प्रत्येक ग्राम पंचायतीत काम करणाऱ्या संगणक परीचालकांचे थकीत व कपात झालेले मानधन, प्रधानमंत्री आवास योजना मानधन,स्वच्छ भारत मिशन मानधन, जलजीवन मिशन मानधन,मिशन अंत्योदय मानधन,ग्रा.पं. स्टेशनरी व इतर समस्यांबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांना निवेदन दिले.

ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा प्रकल्पात काम करणारे संगणक परिचालक हे ग्रामपंचायतीच्या सर्व ऑनलाईन व इतर नागरी सुविधा दाखले देण्याचे काम इमाने इतबारे करत असूनही त्यांचे हक्काचे मानधनापासून सर्व संगणक परिचालक वंचित असून तीन तिन महिने उलटूनही मानधन केले जात नसून बऱ्याच संगणक परिचालकाना सहा सात महिन्यापासून मानधन दिले गेले नाही तर काही संगणक परीचालकांचे मानधन देखील कापण्यात आले आहे. ऐन दिवाळी सणाला देखील मानधन न दिल्याने संगणक परीचालकांची दिवाळी अंधारातच गेली. कोरोनाच्या संकटकाळात देखील शासनाचे कोणतेही विमा कवच नसताना देखील जीवाची पर्वा न करता संगणक परीचालकांनी दिलेले कामांची जबाबदारी पाळली. वरीष्ठ पातळीवर दबाव आणून सर्व प्रकारचे कामे करवून घेतली जातात पण मानधनाच्या बाबतीत सर्व मूग गिळून गप्प बसत असल्याने संगणक परिचालक वाऱ्यावर असल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे संगणक परीचालकांचे आर्थिक शोषण होत आहे.शासन हे महाराष्ट्र डिजिटलायजेशन करणाऱ्या संगणक परीचालकांनाच उपाशी ठेवत असून त्यांच्या प्रलंबीत आयटी महामंडळात सामावून घेण्याच्या व वेतनवाढीच्या मागणीला वारंवार केराची टोपली दाखवत आहे.त्यामुळे संगणक परीचालकाना केवळ महिन्याला सात हजार रुपयांवर कुटुंब चालवावे लागत आहे.ह्या सात हजारापोटी प्रत्येक ग्राम पंचायतीकडून बारा हजार घेतले जात असून होत असलेल्या गैरकारभाराला देखील शासन कानाडोळा करीत आहे. तसेच शासन निर्णयानुसार केंद्रचालकाना शासननिर्णय व्यतिरिक्त इतर अन्य कामे जसे की,प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, मिशन अंत्योदय,इओएल सर्वेक्षण व इतर तत्सम योजनेची कामे स्थानिकांकडून व वरिष्ठांकडून मानधन मिळण्याच्या शाश्वतीवर सांगितले जातात.परंतु वर्षाचा कालावधी उलटूनही आजपावेतो उपरोक्त योजनेच्या केलेल्या कामाचे मानधन संगणक परीचालकाना मिळलेले नाही आहे. तरीही संगणक परिचालक कुठलीही तक्रार न करता कामे करत असून देखील ग्रा.पं. स्तरीय व पंचायत स्तरीय पदाधिकारी मंडळीकडून नेहमी संगणक परीचालकांना कामावरून कमी करू किंवा ग्रा.पं. ठराव करून कमी करून टाकू असे दबावतंत्र वापरत असून परीचालकांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच ग्राम पंचायतीचे संगणक व प्रिंटर नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्ती बाबतची वरिष्ठ पातळीवर कुठलीच कार्यवाही केली जात नसून तरीही संगणक परिचालक हे आपल्या परीने स्व-खर्चावर ग्राम पंचायतीचे कामे करून देत असतात. तरी, शासनाने संगणक परीचालकांने थकीत मानधन त्यासोबतच स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री घरकुल,मिशन अंत्योदय, जलजीवन,इओएल सर्वेक्षण चे मानधन त्वरित करून इतर समस्यांचे देखील तात्काळ निराकरण करण्यात यावे याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांना संघटनेचे पदाधिकारी अशोक पाटील, प्रभाकर पाटील,सागर मोरे, शाम पाटील आदींनी दिले. यावेळी संगणक परिचालक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button