Amalner

?️ अमळनेर कट्टा..तलाठयांवर हल्ला करणारे फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

?️ अमळनेर कट्टा..तलाठयांवर हल्ला करणारे फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात…
दि.२२/०५/२०२१ रोजी अमळनेर तालुक्यातील गंगापुरी शिवारात तापी नदीच्या पात्र
अवैध रित्या वाळू या गौण खनिजाची चोरठी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक/मालक यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर सदर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांनी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना धक्का बुक्की करुन जिवे ठार मारण्याच्या प्रत्यन करुन त्यांच्या ताब्यातून ३ ट्रॅक्टर वाळूसह पळवून घेऊन गेलेले होते सदर घटनेबाबत अमळनेर पो.स्टे.ला गुरनं २३२/२०२१ भादवि कलम ३०७, ३५३, ३७९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे दाखल
झाला. त्यातील आरोपी निष्पन्न चार आरोपीतांपैकी १) जगन हरसिंग पावरा, वय-५५ वर्षे, रा. अंवर्दे ता. चोपड़ा २) महेश ज्ञानेश्वर पवार, वय-२७ वर्षे, रा. रा. अंवर्दै ता. चोपडा ३) धिरज प्रभाकर धनगर, वय-२२ वर्षे, रा. बुधगांव ता. चोपडा यांना आज दि.२६/०५/२०२१ रोजी १८:३४ वाजता अटक करण्यात आलेली असून सदर आरोपीतांनी पळवून नेलेले ट्रॅक्टर क्र. MH-१९-CJ-१५३३ गुन्हयांच्या तपासकामी जप्त करण्यात आलेले आहे. राहिलेले आरोपीतांचे नांवे निष्पन्न करुन तसेच
इतर दोन ट्रॅक्टरांचा शोध घेण्यात येत आहे.
सदर गुन्हयात आरोपीतांची तात्काळ अटक करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक,
जळगांव श्री. डॉ. प्रविण मुंढे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मा. अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव श्री. सचिन गोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर श्री. राकेश जाधव यांच्या सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार पोउपनि/ नरसिंह वाघ, पोशि/३०३८ योगेश महाजन, पोशि/३०१६ विनोद त्र्यंबक धनगर यांच्या पथकाने
सदरची कारवाई केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button