Amalner

?️अमळनेर कट्टा…मुलाच्या अस्थींचे पाण्यात विसर्जन न करता त्या अस्थी शेतात वृक्षारोपण करून घातला नव विचारांचा पायंडा..!अमळनेर येथील शिरूडकर परिवाराचा उपक्रम..

?️अमळनेर कट्टा…मुलाच्या अस्थींचे पाण्यात विसर्जन न करता त्या अस्थी शेतात वृक्षारोपण करून घातला नव विचारांचा पायंडा..!अमळनेर येथील शिरूडकर परिवाराचा उपक्रम..

अमळनेर येथे मुलाच्या अस्थींचे पाण्यात विसर्जन न करता त्या अस्थी शेतात पुरुन त्यावर आंबा व पिंपळ वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे परिवाराने दिला आहे. राधाकृष्ण नगरातील रहिवासी तथा गटशिक्षणाधिकारी अशोक दामू (शिरुडकर) यांचा मुलगा
कुणाल अशोक शिरूडकर यांची नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या स्मृती जपण्याचा निर्धार ह्या कुटुंबाने केला
मुलाच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना देखील त्यांनी जळगाव येथे अंत्यसंस्काराचे कार्य पार पाडले तर अस्थींचे विसर्जन न करता त्या खड्ड्यात पुरून त्यावर पिंपळ आणि आंबा ह्या वृक्षांचे रोपण करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
पिंपळ व आंबा हे ऑक्सिजन देणारे वृक्ष आहेत. या वृक्षांच्या रोपणाने भविष्यात
परंतु, कुणालच्या कुटुंबीयांनी कुणालची आठवण सतत राहिल.
कुणालच्या स्मृतिप्रीत्यर्थ रोपण केलेले हे वृक्ष वाटसरूंना सदोदित प्राणवायू देतील, हा दृष्टिकोन ठेवून परिवाराने आंबा व पिंपळ या दोन वृक्षांचे रोपण केले. व एका पुरोगामी विचारसरणी ला जन्म देत रूढी परंपरा ना फाटा दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button