Parola

झपाटभवानी मंदिरात सापडलेली पर्स माधुरी कासार यांना मंगेश तांबे यांनी केली परत .

झपाटभवानी मंदिरात सापडलेली पर्स माधुरी कासार यांना मंगेश तांबे यांनी केली परत .

पारोळा प्रतिनिधी कमलेश चौधरी
शहरातीलआई झपाटभवानी मंदिरात दर्शनासाठी आलेली भगिनी सौ. माधुरी कासार घाईगडबडीत आपली पर्स विसरून गेली होती.सदर पर्स मंदिरात जावेदखान बेलदार आणि संतोष जोगी या सेवकऱ्यांना मिळाली त्यांनी उपनगराध्यक्ष मंगेश तांबे यांच्याशी संपर्क केला.त्यांनी पारोळ्याचे उपनगराध्यक्ष मंगेश तांबे यांच्याकडे प्रामाणिकपणे आणून जमा केली.या पर्समध्ये जवळपास 35 हजाराचे मंगळसुत्र आणि रोख रक्कम होती.
झपाट भवानी मंदिरात सौ.माधुरी कासार हे मंदिरात विचारपूस करण्यासाठी आल्या असता सदर पर्स विषयी त्यांना सर्व गोष्टींची विचारपूस करून तपासून परत केली व संतोष जोगी व जावेद खान बेलदार यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. त्यावेळी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार व कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, उपनगराध्यक्ष मंगेश तांबे, नगरसेवक पी जी पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख अशोक मराठे,माजी शिवसेना प्रमुख अण्णा चौधरी,दिलीप चौधरी,धीरज महाजन, मंदिरातील सेवेकरी,मंदिर परिसरातील नागरिक उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button