Amalner

अमळनेर महिला मंचवर ठराविक समाजातील महिलांची मक्तेदारी… मंच झाला प्रायव्हेट लिमिटेड

अमळनेर महिला मंचवर ठराविक समाजातील महिलांची मक्तेदारी… मंच झाला प्रायव्हेट लिमिटेड

समाजकारणाच्या नावाखाली खेळली जाते आहे राजकीय खेळी

मंच चे रजिस्ट्रेशन पंजिकरण झालेले नसताना 10 रु तिकीट फाडून प्रवेश फी घेण्याचा अधिकार आहे का?

प्रा जयश्री साळुंके

अमळनेर येथील दोन वर्षांपूर्वी अमळनेर महिला मंच नावाने सर्व समाजातील महिलांना समाविष्ट करून सामाजिक कार्य करण्यासाठी तसेच महिलांचे सुप्त गुण आणि त्यांना व्यासपीठ देण्यासाठी स्थापित करण्यात आला होता. परंतु आज च्या घडीला अमळनेर महिला मंच ची सर्व सूत्रे काही ठराविक सवर्ण समाजातील महिलांच्या हाती आहेत.या मंच मध्ये आदिवासी, बहिष्कृत,अल्प संख्याक,महिलांना स्थान नाही हे दोन वर्षात सिद्ध झाले आहे.

पाच सदस्यीय मंडळ असून यात अध्यक्ष डॉ अपर्णा मुठे ब्राम्हण, उपाध्यक्ष तिलोत्तमा पाटील मराठा,कांचन शाह गुजराथी सचिव सरोज भांडारकर शिंपी,सदस्य सरोज भावे ब्राम्हण इ चा समावेश आहे. पाच महिलांच्या कार्यकारणी मध्ये दोन ब्राम्हण महिला असण्याचं कारणच नाही आहे.एकीकडे सर्व धर्म जाती समावेशक असलेला अमळनेर महिला मंच अशी प्रसिद्धी करावयाची आणि इतर समाजातील ऍक्टिव्ह कार्यक्षम महिलांना वगळायच अशी जाती पाती युक्त राजकीय खेळी महिला मंच च्या माध्यमातून खेळली जात आहे.

दोन वर्षांपासून झालेल्या कार्यक्रमाचा आर्थिक हिशोब देण्यास मंच च्या अधिकृत सदस्य कमी पडले आहेत.

प्रत्येक वर्षी 3 जाने च्या कार्यक्रमात देखील विशिष्ट जातींच्या महिलांचे,वर्चस्व दिसून येत आहे. मग ते परीक्षक असो,वैचारिक प्रबोधन करणारे पाहुणे असो ठराविक समाजातीलच बोलावले जातात.सूत्र संचलन,आभार किंवा इतर कामे देखील ठराविक समाजातील महिलांमध्येच पुन्हा पुन्हा रिपीट केले जातात.वर्षभर ज्या महिला बैठक किंवा इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी नसतात त्या अचानक पणे महिला उत्सवाच्या वेळी व्यासपीठावर चमकतात.आणि ज्या महिला वर्ष भर आपल्या घरच्या कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळून प्रत्येक बैठक कार्यक्रमला हजेरी लावतात त्यांना डावलले जाते अशी ही तक्रार महिलांनी केली आहे.

बक्षीस देतानाही ठराविक समाजातील महिलांचंच विचार केला जातो. यावर्षी आदिवासी भिल्ल समाजातील महिला सायकल आणि रनिंग स्पर्धेत पहिली आली तिला बक्षीस न दिल्या मुळे तिला आपल्या हक्कांसाठी झगडावं लागलं तेंव्हा तिला तिचे बक्षीस मिळाले .

असे अनेक वेळा घडले असून महिलांच्या अनेक तक्रारी बक्षीस वितरण संदर्भात मिळाल्या आहेत.

सामान्य महिला असतात त्यांना अन्याय होत आहे हे समजत आहे आणि आता त्या स्पष्टपणे अमळनेर महिला मंचच्या भोंगळ कारभारा विषयी तक्रार करीत आहेत.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारण विरहित अमळनेर मंच चे काम असेल असे मंच ची सुरुवात करताना सांगण्यात आले होते परंतु आता फक्त राजकारण आणि राजकीय लोकच च मंच ची धुरा सांभाळत आहेत असे निदर्शनास आले आहे. याबाबतीतअनेक महिला नाराज असून त्यांनी मंच च्या कार्यक्रम मिटिंग ला जाणे सोडून दिले आहे.

या गोष्टीचा परिणाम यावर्षी झालेल्या 3 जाने च्या कार्यक्रमात स्पष्टपणे दिसून आला.त्यामुळे सामान्य महिलांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने सुरू झालेला मंच आणि आजच्या घडीला भरकटलेल्या मंच च्या आरक्षित ठराविक सदस्यांनी आणखी उल्लू बनवू नये अशी सामान्य महिलांची भूमिका आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button