Nashik

लोकशाही भक्कम करण्यासाठी मतदान जनजागृती करून सर्वांचा सहभाग आवश्यक- डॉ संदीप आहेर दिंडोरीत मतदार दिन साजरा

लोकशाही भक्कम करण्यासाठी मतदान जनजागृती करून सर्वांचा सहभाग आवश्यक- डॉ संदीप आहेर
दिंडोरीत मतदार दिन साजरा

सुनिल घुमरे नाशिक

दिंडोरी : आपल्या भारताची लोकशाही बळकट व भक्कम करण्यासाठी सर्व जनतेने व युवकांनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी असे आवाहन दिंडोरी पेठ विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ संदीप आहेर यांनी केले.
संपूर्ण भारतभर 25 जानेवारी हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जात आहे .
जनता इंग्लिश स्कुलमध्ये मतदार जनजागृती ,मतदार दिन निबंध व रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, प्राचार्य बी जी पाटील, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार आबासाहेब तांबे ,उपमुख्याध्यापक यु डी भरसठ ,पर्यवेक्षक, बी बी पुरकर ,के एस वारुंगसे, यु डी बस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.व परीक्षण करण्यात आले.
तसेच यावेळी प्राचार्य बी जी पाटील यांनी प्रास्तविकात मतदार दिन या विषयी माहिती देऊन मतदार जनजागृती मध्ये सर्वांनी सहभागी होऊन लोकशाही सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हाहन केले..
यावेळी जनता इंग्लिश स्कुल मध्ये मतदार दिन विषयावर निबंध व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी रांगोळी स्पर्धांचे उदघाटन प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर ,तहसीलदार पंकज पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
निबंध स्पर्धा – माध्यमिक गट (इयत्ता ९वी,१०वी ) प्रथम क्रमांक- कु , फड त्रिवेण द्वितीय – कुमारी अपसुंदे प्रगती , तृतीय- कुमारी गावीत संध्या ज्यू कॉलेज गट (इयत्ता ११वी ,१२वी) प्रथम क्रमांक- कुमारी पवार प्रतीक्षा, द्वितीय क्रमांक- कुमारी बोलकर उन्नती, तृतीय क्रमांक- कुमार चौधरी प्रतीक दत्तू, रांगोळी स्पर्धा – माध्यमिक गट (इयत्ता ९वी,१०वी) प्रथम- कुमारी – पगारे तन्वी, द्वितीय- कुमारी देशमुख गायत्री ,तृतीय- मोरे अपेक्षा
कॉलेज गट (इयत्ता ११वी ,१२वी) प्रथम क्रमांक- कुमारी चौधरी दुहिता ,द्वितीय क्रमांक- कुमारी अपसुंदे ऋतुजा, तृतीय क्रमांक- झनकर रोहिणी या सर्व स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी उपस्थित विद्यार्थी
व शिक्षक यांच्याकडून तहसीलदार पंकज पवार
यांनी मतदार प्रतिज्ञा वधवून घेण्यात आली.
*उत्कृष्ट मतदान केंद्र अधिकारी यांचा सन्मान*
मतदार दिनांच्या निमित्ताने दिंडोरी तालुक्यातील BLO ग्रामसेवक सर्वेश पाटील, तलाठी के पी देशमुख, पर्यवेक्षक आर एम पवार, संगणक परिचालक राजू पाटील, जगदीश बागुल, अंगणवडीवसेविका सुरेखा बोरस्ते, कोतवाल रतन खैरनार कर्मचारी विनोद जाधव आदींना उत्कृष्ट BLO म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता इंग्लिश स्कुल , तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, लिपिक राजू पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार पर्यवेक्षक , यु डी बस्ते यांनी मानले.
निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीम सुमन विरकर, श्रीम वंदना सोनवणे, सुदर्शना गाजरे, कॉलेजच्या प्राध्यापिका एम एन जगताप ,नांदे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य बी जी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजचे विभागप्रमुख,सर्व प्राध्यापक, माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो-दिंडोरी येथे मतदार दिन कार्यक्रमाप्रसंगी प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, प्राचार्य बी जी पाटील, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे आदी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button