Maharashtra

डॉ कलाम आंतराष्ट्रीय जीवनपट लघुपट स्पर्धा

डॉ कलाम आंतराष्ट्रीय जीवनपट लघुपट स्पर्धा

डॉ. कलाम यांच्या खर्‍या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी व त्यांचा जीवनपट इतरांना मार्गदर्शक होण्याच्या उद्देशाने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनने युवा पिढीसाठी आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित केलेली आहे. पद्मभूषण ए. आर. रहमान यांनी आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर इंटरनेशनल शॉर्ट फिल्मचे पोस्टर लाँच केले. डॉ. कलाम यांचे शब्द आजही लोकांच्या कानात पडतात तेव्हा त्यांच्या कार्याचा आदर केला जातो. डॉ. कलाम यांच्या जीवनातील विविध पैलूंचे उत्कृष्ट वर्णन नवीन पिढीसमोर आणण्यासाठी व नवोदित कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेसाठी पाच वेगवेगळ्या थीम उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याप्रमाणे तरुण कलाकार चांगल्या कल्पनेसह त्यांच्या अभिनव कल्पना सादर करतात. डॉ. कलामांना ही एक श्रद्धांजली तसेच व्हिज्युअल ट्रीट असेल जे त्यांना व त्यांच्या कार्यास प्रेरणेचे स्रोत मानतात. साधारणपणे 3 ते 20 मिनिटांच्या कालावधीचा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर लघुपट (छोटा व्हिडीओ) बनवायचा आहे. या स्पर्धेमध्ये वय 18 वर्षांवरील सर्व मुलांसाठी खुले आहे. प्राप्त झालेल्या लघुपटातून योग्य लघुपट प्रख्यात निर्णायक मंडळाद्वारे निवडला जाईल. आणि जे सर्वोत्कृष्ट 3 चित्रपट विजयी चित्रपट म्हणून निवडले जातील त्यास रोख किंमतीने पुरस्कार दिले जातील. याव्यतिरिक्त, पुरस्कार, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येतील. डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्ही आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो.
Entry Form Registration link details :- https://www.apjabdulkalamfoundation.org/shortfilm/form
अधिक माहितीसाठी संकेत स्थळास भेट द्यावी किंवा कॉल करा 9486661931 ; 04573 221931
Thank You
मनीषा ताई चौधरी ( महाराष्ट्र राज्य समन्वयक)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button