Maharashtra

?️अमळनेर कट्टा..कृषीपंप वीज पुरवठा खंडीत न करणे बाबत….मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे निवेदन..

?️अमळनेर कट्टा..कृषीपंप वीज पुरवठा खंडीत न करणे बाबत….मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे निवेदन..

कोरोना संकटामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात आहे, शेतकरी अडचणीत आहे.
शेतकऱ्यांनी वीजेचे बील भरले नाही म्हणून सबंध गावाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे काम संदर्भाधीन शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी करीत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे.
शेतकरी कोरोनाच्या, निसगार्गाच्या संकटाशी मोठ्या धैर्याने मुकाबला करीत आहे.
त्यांना धीर देणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या शेतांमध्ये गहू, हरभरा, मका,कांदा आणि भाजीपाला व फळपिके आदि रब्बी हंगामातील पिकांचे वेळेवर शेतीला अखेरचे पाणी देणे आवश्यक असतांना महावितरण कंपनीचे शेतक-यांनी वीजेचे बील भरले नाही तर कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करीत आहे. आज शेतीच्या पिकांसाठी शेतक-यांना वीजेची गरज आहे. त्यांना शासन निर्णय दिनांक 18 डिसेंबर, 2020 चे सहपत्रातील अनुक्रमांक 9 अन्वये वीज बील वसुली योजनेत सहभागी होण्याचा कृषी ग्राहकांना चालू वीज बील भरणे क्रमप्राप्त राहील व तसे न केल्यास सदर ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येतो अशा शासन निर्णयान्वये शेतक-यांना बीज
बील भरणाबाबत मुदतवाढीसह नोटीसा देवून वीज बील भरण्यासाठी सवलत देण्यात यावी अशी विनंती केली आहे.
महाराष्ट्र शासन,उद्योग व उर्जा विभाग शासन निर्णय दिनांक 18 डिसेंबर,
2020 मधील अनुक्रमांक 9 कृषी ग्राहकांकडून चालू वीज बिल भरणे क्रमप्राप्त नुसार अंमलबजावणी करण्यात येवून वीज पुरवठा खंडीत करण्यात येवू नये यासाठी आपले अनमोल सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रति माना श्री.अजितदादा पवार, मा.ना.श्री.नितीन राऊतझ मा ना श्री गुलाबराव पाटील,मा.अतिरिक्त कार्यकारी अभियंता, मा कार्यकारी अभियंता, मा. अधिक्षक अभियंता,महाराष्ट्र राज्य वीज वितरण महाराष्ट्र राज्य वीज वितरण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अमळनेर उपविभाग कंपनी धरणगांव विभाग कंपनी जळगांव मंडळ कार्यालय, अमळनेर जि. जळगांव इ ना देण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button