Maharashtra

नेहरू युवा केंद्राची कोरोना विरोधी मोहीम

नेहरू युवा केंद्राची कोरोना विरोधी मोहीम

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

कोरोना पार्श्वभूमीवर मा.जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या आदेशानुसार दिनांक १८-०३-२०२० पासुन नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार) यांच्या वतीने कोरोना संसर्ग विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे.तसेच सौ.वृषाली तेलोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे कोरोना पार्श्वभूमीवर नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार) यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कार्य करण्यासाठी संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये स्वयंसेवकांना एकत्र करण्याकरिता प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन न करता सोशल मीडियाचा वापर करून तालुका पातळीवर व्हाट्सआप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र करण्यात आले आहे.जिल्ह्यामध्ये तालुका पातळीवर एकूण१५ व्हाट्सआप ग्रुप आहेत त्याचप्रमाणे जिल्हा पातळीवर १ व्हाट्सआप ग्रुप आहे.या व्हाट्सआप ग्रुप सदस्य संख्या तब्बल १६१८ एवढी आहे.तसेच या सदस्यामधील मधील आपत्ती व्यवस्थापन कार्य करण्यासाठी इच्छुक स्वयंसेवक २३३ एवढी संख्या आहे.

जिल्हा युवा समन्वयक धनंजय काळे व लेखाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वयंसेवक देशहिताचे कार्य करत आहेत.तालुका पातळीवर कोरोना संसर्ग जनजागृती,प्रशासनाच्या सूचना अंमलबजावणी, निर्जंतुकीकरण फवारणी,आपत्ती व्यवस्थापन कार्य,

अन्नधान्य किट्स एकत्रिकरण,निर्जंतुकीकरण फवारणी इ कार्ये या स्वयंसेवकाच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्र करत आहे .

लॉक डाउन काळामध्ये गरजू कुटुंबाना अन्नधान्य पुरवठा सुरळीत चालू चालू रहावा याकरिता प्रशासनाबरोबर हे स्वयंसेवक अन्नधान्य किट्स जमवून त्या तालुक्यातील तहसिल कार्यालयात जमा करत आहेत.परंडा तालुका समन्वयक रणजीत पाटील यांनी १० अन्नधान्य किट्स परंडा तहसिल कार्यालयामध्ये जमा केली आहेत तरनेहरु युवा केंद्र उस्मानाबाद शी सलग्न राहून काम करत असलेली प्रेमसाधना बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था,मंगरूळ ता.कळंब जि.उस्मानाबाद यांच्याकडून कळंब येथे गरजू लोकांना मदत म्हणून देण्यासाठी किराणा मालाच्या २२५ किट्स पाठून दिल्या आहेत तसेच समाज सुधारक मंडळ माडज आणि नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद, लोहारा तालुका यांच्या वतीने जेवळी ग्रामपंचायतीस ५ अन्नधान्य किट आणि २५०० रुपये रोख सुपूर्द करण्यात आले आहेत.

खरंखोरंच पोलीस यंत्रणा,डॉक्टर्स,नर्स,सफाई कामगार यांच्याप्रमाणेच आज देशाला आज मदतीची गरज आहे वेळी या स्वयंसेवकानीं खुप मोठ्या हिमतीने या कार्यामध्ये झोकून दिले आहे.यामध्ये रणजीत पाटील,रामेश्वर चोबे,प्रदीप साठे,रविकांत सुरवसे,विजय कोळगे, रोहन गाढवे,प्रशांत मते,घनश्याम वाघमारे,सुहास कादे,वैभव लांडगे,सुधीर घोलप,किशोर औरादे,किशोर नावडे,पुरुषोत्तम बेले,गणेश नावडे, किशोर होणजे,अमर ताटे,प्रभाकर डोंबाळे,पूजा डोंबाळे,पल्लवी जाधव, विजय पाखरे,इ परिश्रम घेत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button