कादवा ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.कादवा करणार सी.एन.जी.प्रकल्प
सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
दिंडोरी – साखर उद्योग विविध अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवा ने सातत्याने उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक उसाला भाव दिला असून कार्यक्षेत्रात ऊस लागवड व एकरी उत्पादन वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून उसाची पुरेशी उपलब्धता झाल्यावरच प्रकल्प विस्ताराचा निर्णय घेतला जाईल तसेच सी.एन.जी. प्रकल्प प्रस्तावित असल्याचे प्रतिपादन कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
कादवा कारखान्याची 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमाळीच्या वातावरणात पार पडली त्यावेळी श्रीराम शेटे बोलत होते.
प्रारंभी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते कारखान्याचे संस्थापक रा.स.वाघ यांचे पुतळ्याला पुष्पहार घालण्यात येवून अभिवादन करण्यात आले.
कारखान्याचे संचालक, शहाजीदादा सोमवंशी यांनी सभासदांचे स्वागत केले .सचिव राहुल उगले यांनी अहवालामध्ये झालेल्या दोष दुरुस्ती चे वाचन केले. चेअरमन श्रीराम शेटे यांनी प्रास्ताविक करताना कारखान्याची वाटचाल विस्तिरणपणे विषद करत यंदा कारखान्यास नफा मिळत लेखा परीक्षणात ‘अ’ वर्ग मिळाला असल्याचे सांगत कादवा च्या विकासात सर्वांनी मोलाचे योगदान दिल्याबद्दल आभार मानले.यंदा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित होणार असून नव्याने सी.एन.जी. प्रकल्प हाती घेणार असल्याचे सांगितले.तसेच गाळप क्षमता 2500 मेटण वरून 3500 मेटन नेण्याची शासन परवानगी मिळवली असून इथेनॉल प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले मात्र सदर प्रकल्प विस्तार हे पुरेसा ऊस उपलब्ध झाल्यावरच केले जातील असे सांगत सर्वांनी जास्तीत जास्त ऊस लावावा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी उत्पादन वाढवावे असे आवाहन केले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या संचालक पदी श्रीराम शेटे यांची तर मविप्र च्या संचालक पदी प्रवीण जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सभासद सचिन बर्डे, नरेंद्र जाधव,माजी चीफ केमिस्ट विजय वाघ,हिरामण बोंबले यांनी कारखान्याचे कारभारावर टीकास्त्र सोडत प्रश्न विचारले.त्याच प्रमाणे ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, संपतराव कावळे, संजय पाचोरकर, दिलीप जाधव, जे.डी केदार, जयराम डोखळे, दत्तात्रेय देशमुख आदींनी प्रश्न उपस्थित केले.चेअरमन श्रीराम शेटे यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. विठ्ठलराव संधान, संपतराव कोंड, माजी कर्मचारी विश्राम दुगजे
यांनी चर्चेत भाग घेत सूचना मांडल्या.संचालक शहाजी दादा सोमवंशी यांनी आभार प्रदर्शन केले, सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले व सदर सभेस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,माजी आमदार धनराज महाले, मविप्र संचालक प्रवीण जाधव,शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव बस्ते यांचेसह सर्व संचालक कार्यकारी संचालक हेमंत माने आदींसह सभासद अधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऊस उत्पादकांचा सन्मान
सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे सभासद सचिन बर्डे, प्रकाश केदार,सौरभ शेटे, अनुपम भालेराव, मधुकर टोपे, कर्मचारी गटा तुन महेंद्र मोरे तसेच आडसाली प्रकारामध्ये महेंद्र जाधव, संदीप कारभारी मोगल, पूर्व हंगमी मध्ये संकेत सोमवंशी, वैभव पाटील, सुरू प्रकारांमध्ये सागर संधान, विलास वाळके, खोडवा प्रकारांमध्ये निवृत्ती देवरे, लक्ष्मण शिरकांडे, यांचा सन्मान करण्यात आला.






