Amalner

?️ अमळनेर कट्टा… बोदवड तालुक्यातील विकलांग महिलेवर आत्यचार बाबत प्रांतधिकारीना निवेदन देताना.

?️ अमळनेर कट्टा… बोदवड तालुक्यातील विकलांग महिलेवर आत्यचार बाबत प्रांतधिकारीना निवेदन देताना.

विनोद जाधव अमळनेर .

अमळनेर : अमळनेर विकलांग व विधवा महिला गीता राजू गायकर या महिलेवर विकलांग पणाचा फायदा घेवून, लखन श्रावण माळी या नराधमाने त्याला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक शोषण केले.आणि तिला गरोदर ठेवले,आणि तिला धमकी देऊन तू जर कोणाला सांगितलं तर तुला आणि तुझा परिवाराला जिवे मारून टाकू अशी धमकी दिली.आणि ती महिला पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यासाठी गेली असताना ठाणे अमलदार यांनी त्या महिलेचा अशिक्षितपणाचा फायदा घेवून साधा अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेवून तिला ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे पाठवण्यात आले.व तेथून तिला महिला पोलिसानी नेणे गरजेचे होते. परंतू स्वताच पुरुष पोलिसांनी जळगाव शासकीय आशादिप वसतिगृहात घेवून गेले.हा स्त्रीचा अपमान आहे. अशा टाळाटाळ करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस प्रशासनाने धडा शिकवला पाहिजे किंवा निलंबित करावे.जर पोलिसांनीच स्त्रीचा आदर केला नाही.सन्मान केला नाही तर न्याय कुठे मांगन्यासाठी जायचा असा सवाल पोलीस प्रशासनाला विचारण्यात येत आहे.आणि जर असे कामचोर पोलिसांना निलंबित केले नाही तर राष्ट्रीय विकलांग पार्टी कडून धरणे आंदोलन करण्यात येईल. या वेळी निवेदन देताना राष्ट्रीय विकलांग पार्टी जिल्हा उपाध्यक्ष दीपक सुरेश पाटील तालुका अध्यक्ष बिरजू छगन चौधरी. शहर अध्यक्ष अमोल मधुकर पाटील. शहर उपाध्यक्ष करीम बागवान महिला मोर्चा सारिका शर्मा व रमजान पिरन खाटीक हे मान्यवर उपस्थित होते.

?️ अमळनेर कट्टा... बोदवड तालुक्यातील विकलांग महिलेवर आत्यचार बाबत प्रांतधिकारीना निवेदन देताना.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button