Baramati

युवकांनी महिलाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवावी :- पोलीस मित्र संघटना पुणे महिला कार्यध्यक्ष शुभांगी चौधरी बारामती

युवकांनी महिलाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवावी :- पोलीस मित्र संघटना पुणे महिला कार्यध्यक्ष शुभांगी चौधरी बारामत

अमोल राजपूत

वालचंदनगर: वर्ध्यातील हिंगणघाट मधील घडलेली घटना हा अतिशय क्रूर आहे. भारतात आजही महिला असुरक्षित असतांना दिसत आहेत, एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रकार हा अतिशय मन हेलावून टाकणारा आहे. एकीकडे माहिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतानाच, दुसरीकडे पेट्रोल ओतून जाळणे, ऑशिड हल्ला करणे, बलात्कार करणे, आशा एक ना अनेक प्रकार आपल्या देशात घडताना दिसत आहेत. व या आरोपीवर कठोर अशी शिक्षा होतांना दिसत नाही. स्वातंत्र्यापासून पुरोगामी महाराष्ट्रात अशी घटना घडतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

भारतात छेडछाडीचा घटनेमध्ये वाढ झालेली दिसून येते, व त्याचप्रमाणे महिला घराबाहेर पडली तर वापीस घरी येती का नाही या घाटनेवरून मात्र मनामध्ये एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात. या नराधमांना पोलिसांना पकडण्यात यश येतो पण यावर कठोर कारवाई लवकरात-लवकर करण्यात अशी महिलांनी आपली मते व्यक्त करताना दिसतात.
आपल्या देशामध्ये महिलांकडे बघण्याची दृष्टी चांगली ठेवली तर आपला देश सगळ्याच अडचणीतून मुक्त होईल, व अशा या नराधमांना कठोरात-कठोर शिक्षा व्हावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button