Amalner

Amalner: पर्यावरण पूरक गणपती स्पर्धेच्या विजेत्यांना नगरपरिषदेकडून  बक्षीस वितरण..!

Amalner: पर्यावरण पूरक गणपती स्पर्धेच्या विजेत्यांना नगरपरिषदेकडून बक्षीस वितरण..!

अमळनेर नगरपरिषद अमळनेर जि. जळगाव माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियांनातर्गत अमळनेर नगरपरिषदेने पर्यावरण पुरक गणपती स्पर्धा आयोजीत केलेली होती. या स्पर्धेचे घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सव स्पर्धा अश्या दोन गटात विभाजन करण्यात आलेले होते. पर्यावरण पुरक गणेश उत्सव स्पर्धेच्या अटीनुसार मंडळ व घरात पर्यावरण पुरक वस्तू पासून गणेशजीची मुर्ती स्थापन करणे बंधनकारक होते. तसेच स्पर्धेत भाग घेणा-या स्पर्धकांनी माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण २०२२, प्लॉस्टीक बंदी या विषयांवर देखावे अथवा आरास सादर करणे, कचरा घंटा गाडीत टाकणे, प्लॉस्टीकचा वापर टाळणे तसेच सर्वात महत्वाचे किमान ५ झाले लावणे बंधनकारक होते.

या पर्यावरण पुरक घरगुती गणपती स्पर्धा स्पर्धेत शहरातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिदास दिला. तसेच डि. आर. कन्या हायस्कुल या शाळेतील विद्यार्थ्यांनी सभागात नोंदविला. दि. ३१/०८/२०२२ ते ०५/०९/२०२२ या कालावधीत १०० + अधिक शहरातील नागरिकांनी नोंदणी केली. यात नगरपरिषदे मार्फत प्रशांत ठाकूर
(अभियंता), विजय सपकाळे यांनी परिक्षण केले. व शहरातील ३० उत्कृष्ट शाडू मातीच्या गणेश मुर्ती स्थापन करणा-या स्पर्धकाची निवड करण्यात आलेली होती.
सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण आज नगरपरिषद सभागृत येथे करण्यात आले.

पुरस्काराचे वितरण मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री प्रशांत सरोदे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी स्पर्धेतील घरगुती गटात १. ओम प्रमोद लटपते,२. हर्षिदा श्याम कंरदीकर, घरगुती व शाळेय गटात डि.आर. कन्या हायस्कुल च्या विद्यार्थीनी प्रणिता अनिल चौधरी व कावेरी सुभाष पवार, नेहा संजय कुंभार, प्राचि चंद्रकांत महाजन यांना सर्वोकृष्ट ५ स्पर्धकांना माझी वसुंधरा अभियांना अंतर्गत अग्नी, जल, वायु, भुमी व आकाश या पंचतत्वांच्या नावाने रोख बक्षिसे, व प्रशस्तीपत्र देवून गौवरण्यात आले.

सार्वजनिक गटातून राजमुद्रा गणेश उत्सव मंडळ, प्रगती कोचिंग क्लासेस, शिवराय मित्रमंडळ या मंडळांना बक्षिसे, व प्रशस्तीपत्र देवून गौवरण्यात आले. सदर पुरस्काराचे वितरण मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री प्रशांत सरोदे यांचे हस्ते करण्यात आले. व कार्यक्रमाचे सुत्र संचलन संजय चौधरी प्रशासन अधिकारी
यांनी केले. सदर कार्यक्रमास श्याम पाटील माजी नगरसेवक, डॉ. अनिल शिंदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, अमोल भामरे, डिगबंर वाघ अभियंता, प्रशांत ठाकूर अभियंता, विजय सपकाळे, युनुस शेख व डि.आर. कन्या हायस्कुलचे दिनेश पालवे सर व इतर नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button