Dhule

धुळे शहरातील अतिसंवेदनशील भागात लागणार CCTV कॅमेरे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली ५० लाख २४ हजार रुपयांची मंजुरी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांची माहिती…

धुळे शहरातील अतिसंवेदनशील भागात लागणार CCTV कॅमेरे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली ५० लाख २४ हजार रुपयांची मंजुरी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांची माहिती…

धुळे : शहरात वारंवार निर्माण होणारा तणाव लक्षात घेता संवेदनशील भागात सीसीटीवी कॅमेरा बसविण्याचा विषय अनेक दिवसापासून प्रलंबित होता. हा प्रश्न सुटणार का? शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुंडांचा व समाज कंटकांचा तसेच चैन स्नेचींग सारख्या व ईतर घडणाऱ्या गुन्ह्यात मोकाट फिरत असलेल्या चोरांच्या मुसक्या आवळणे आवश्यक होते. धुळ्यात २००८ व २०१३ मध्ये दोन गटांच्या तणावनंतर दंगल घडली आणि त्यावेळी सीसीटीवी कॅमेरा बसविण्याचा विषय चर्चेत आला होता त्यानंतर सदरच्या विषयावर चर्चा झाली नाही. नियोजन मंडळाने तात्काळ परवानगी देऊन संवेदनशील आणि अति अतिसंवेदनशील भागात हे सीसीटीवी कॅमेरा लावण्याचे नियोजन देखील करण्यात होते यानंतर अधिकारी आणि पदाधिकारी बदलले, सत्ता परिवर्तन झाली तरी हा विषय केवळ मंजुरीच्या आणि प्रस्ताव सादर करायच्या पायरीवरच होता. १०० फुटी रोडवर पुन्हा एका सामाजिक मुद्द्याच्या तणावनंतर मोठा अनर्थ घडता घडता राहिला आणि पुन्हा सीसीटीवी कॅमेरा बसविण्याचा विषय चर्चेत आला.
या विषयाचे महत्व धुळे शहराचे आमदार फारूक शाह हे जाणून होते. त्यांनी आज दि. २५-११-२०२० रोजी मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण साहेब यांची भेट घेऊन त्यांना याचे महत्व व घटनेचे गांभीर्य सांगून धुळे शहरातील अतिसंवेदनशील भागात सीसीटीवी कॅमेरे बसविणे फार गरजेचे आहे हे लक्षात आणून दिले त्याला प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण साहेब यांनी सदर कामाला ५० लाख २४ हजार रुपयांची मंजुरी दिली. सदर सीसीटीवी कॅमेरे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत लागणार असल्याची माहिती आमदार फारूक शाह यांनी कळविली आहे.

शाह फारूक अन्वर
आमदार, धुळे शहर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button