वेल्फेयर सोसायटी फॉर डेस्टिट्यूट childrens बांद्रा,मुंबई या ट्रस्ट वतीने आदिवासी गाव मढ येथे जीवनावश्यक वस्तु वाटप
प्रतिनीधी – दिलीप आंबवणे
मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत मढ यांनी वेल्फेयर सोसायटी फॉर डेस्टिट्यूट childrens बांद्रा,मुंबई या ट्रस्ट कडे जीवनावश्यक वस्तूंची मागणी केली होती ती तात्काळ मंजूर करून ग्रामपंचायत मढ या आदिवासी वाडीतील ट्रस्ट च्या कर्मचाऱ्यांकडून 55 कुटुंबांना किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले.
त्यामध्ये साखर 1किलो, तूरडाळ 1 किलो,मुगडाळ 1 किलो, रवा 1 किलो,मीठ 1 किलो,तेल 1 किलो,चहा पुडा 250 ग्रा,पोहे 1 किलो, मसाला 250 ग्रा, हळद 250 ग्रा, गरम मसाला 250 ग्रा, कांदे -3 किलो
बटाटे -1 किलो या वस्तू दिल्या.
या वेळी बिरसा क्रांती दल मुरबाड अध्यक्ष तुकाराम रडे, उपाध्यक्ष दिलीप शिद, सचिव मधुकर पादिर, महासचिव दिनेश नंदकर, युवा प्रमुख संजय घुटे, कार्याध्यक्ष रवींद्र आंबवणे, कोषाध्यक्ष तुकाराम वाघ, महिला कार्याध्यक्षा संध्याताई जंगले,तसेच गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत होते.
या वेळी बिरसा क्रांती दल मुरबाड अध्यक्ष तुकाराम रडे यांनी वेल्फेयर सोसायटी फॉर डेस्टिट्यूट childrens बांद्रा मुंबई यांचे आभार मानले.






