Maharashtra

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अध्ययन दिन म्हणुन साजरी करण्याचे – पोलीस निरीक्षक सय्यद यांचे आवाहन

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अध्ययन दिन म्हणुन साजरी करण्याचे – पोलीस निरीक्षक सय्यद यांचे आवाहन

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची यंदाची जयंती लॉक डाऊन असल्याने अध्ययन दिन म्हणुन घरीच साजरी करावी असे अवाहन पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांनी केले आहे .

दर वर्षी १४ एप्रील रोजी साजरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते मात्र या वेळी कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखन्यासाठी जमावबंदी आदेश ( लॉक डॉऊन ) असल्याने सर्वानी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंत्ती निमीत्त घरीच सह कुटूंब प्रातिमेचे पुजन करावे तसेच

यंदाची जयंती “अध्ययन दिन” म्हणून साजरी करावी.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या १४ एप्रिल, मंगळवार रोजी जयंती आहे. आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात व आनंदात विविध उपक्रमांसह जयंती उत्सव साजरा करत असतो. परंतु यावेळी कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती आहे. शिवाय सोशल डिस्टन्सचे आपणा सर्वांना काटेकोर पालन करायचे आहे. त्यामुळे यंदाची जयंती सामाजिक भान व सरकारी निर्देशांचे पालन करत साजरी करूया.

तसेच आपण जयंतीचा दिवस सामाजिक विषयाशी संबंधित पुस्तकाचे वाचन करून “अध्ययन दिन” म्हणून साजरा करावे ,डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आपल्या घरीच सहकुटुंब बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुष्प अर्पण करून पूजन करावे व पूजन करतानाचा फोटो आपण आपल्या व्हाट्सअॅप वर प्रोफाइल पिक्चर म्हणून ठेऊ शकतो. जेणेकरून एक सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यास मदत होऊ शकेल.

डॉ. बाबासाहेब यांनी आपणास “शिका, संघटित व्हा व संघर्ष करा” असा संदेश दिला आहे. त्याप्रमाणे आज कोरोनाविरुद्ध लढताना आलेल्या परिस्थितीतून शिकून या जागतिक महामारी विरुद्ध आपणास सर्व भारतीय म्हणून एकजूट राहून संघर्ष करायचा आहे. निश्चितच विजय आपलाच होणार आहे.

असे मत परंड्याचे पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button