Maharashtra

वाळकी येथे आदिवासी प्रेमीयुगालाची आत्महत्या…..

वाळकी येथे  आदिवासी प्रेमीयुगालाची आत्महत्या…..

वाळकी येथे आदिवासी प्रेमीयुगालाची आत्महत्या.....

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल तालुक्यातील वाळकी शिविरातील शालीक नवल पाटील यांच्या शेताच्या बांधावरील बोराचा झाडाला दोघा प्रेमी युगलांनी एकाच दोराला गळफास घेऊन आत्महत्या केली असुन वासुदेव अर्जुन पाटील पोलिस पाटील यांच्या खबरीवरुन ग्रामीण पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात  आली आहे       .
 याबाबत  पोलिस सुञांकडुन प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील वाळकी येथे  मध्ये प्रदेशातील आदिवासी कुटुंब उदरनार्वाहसाठी गेल्या १०/१५ वर्षापासुन आले आहेत  ते निम्माहिस्साने शेती  हा व्यवसाय करीत  होते  दोघेही कुटुंब वाळकी गावात शेजारीच राहत होते दोघेही एकाच समाजाचे असल्यामुळे व नातेवाईकच होते   दोघांचे एकमेकांच्या  घरी येणेजाणे होतं साली व मेहुणे असल्याने   एकमेकांच्या प्रेमात पडले  परंतु दोघांच्या घरी  हा विषय समजल्याने विरोध होवु लागला होता दोघेही  नात्याने संख्खे साली व मेहुणे होते   अनिल सरदार बारेला (३०) रा. देवली दुगाणी ता. वरला जिल्हा बडवानी व चिंगी मुरला बारेला (१९) रा, रोजानीमाल ता.वरला जिल्हा बडवानी या दोन्ही प्रेमीयुगलांचे मृतदेह आज सकाळी ११वाजेचा सुमारास शलिक नवल पाटील यांचा शेताचा बांधावर बोराचा झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले असल्याची माहिती  वाळकी येथील पोलीस पाटील अर्जुन वासुदेव पाटील यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली.असता घटनास्थळी पि आय भिमराव नंदुरकर, सहाय्यक फोजदार नामदेव महाजन, पो हे काँ सुनिल जाधव यांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने प्रेमी युगलांचा मृत्यू देह झाडावरुन खाली उतरुन  ताब्यात घेऊन  चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणुन शवविचौछेदन डाँ.शरद पाटील यांनी  असुन केले दोघांच्याही मृत्यू देह नातेवाईकांनी ताब्यात  घेऊन  मुळगावी मध्येप्रदेशात अंत संस्कार  करण्यात येणार आहे     पुढील  तपास पो.नी नंदुरकर  यांचा आदेशान्वये  स.फौ.नामदेव महाजन करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button