पालघरवसई

श्वास पर्यावरणाचा भव्य पुस्तक प्रकाशन व कविता संग्रहाचे उद्घाटन पर्यावरण मित्र संघटना, भारत संस्थेचे संस्थापक श्री.देवा तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर येथे संपन्न

‘ श्वास पर्यावरणाचा ” भव्य पुस्तक प्रकाशन व कविता संग्रहाचे उद्घाटन पर्यावरण मित्र संघटना, भारत संस्थेचे संस्थापक श्री.देवा तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर येथे संपन्न

श्वास पर्यावरणाचा भव्य पुस्तक प्रकाशन व कविता संग्रहाचे उद्घाटन पर्यावरण मित्र संघटना, भारत संस्थेचे संस्थापक श्री.देवा तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर येथे संपन्न

जिल्हा : पालघर,वसई
रविवार , दिनांक १५ सप्टेंबर २०१९ रोजी, पर्यावरण मित्र संघटना,भारत व पालघर, ठाणे बोलीभाषा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वि.वा.महाविद्यालय, विरार तालुका वसई , जिल्हा पालघर या ठिकाणी , पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व कवी विजय गणू चोघळा व कवी योगेश नंदा तुकाराम गोतारणे यांनी संपादित केलेल्या  ” ध्यास पर्यावरणाचा ”  या काव्यसंग्रहाचे भव्य प्रकाशन सोहळा साठी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे सर तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या ७६ ते ८० ज्येष्ठ तसेच बालकवी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलीभाषा संस्थेच्या अध्यक्षा व श्वास पर्यावरणाचा काव्यसंग्रह संकलक , कवयित्री सौ.सुजाता कवळी तसेच उत्कृष्ठ कवयित्री डॉ.पल्लवी परुळेकर – बनसोडे यांची उपस्थिती होती. यावेळी काव्यमंचावर कवयित्री सौ.कुमूद शहाकार-पर्या.मित्र संघटना संस्थेच्या पालघर जिल्हा महिला अध्यक्षा, कवयित्री सौ.नेहा धारूळकर – शब्दालंकार साहीत्य मंडळ, विरार, अॅड.अर्चना जैन, कवयित्री कु.गौरी संखे स्मिता भातगावकर, सौ.संगीता पाध्ये आदि संस्थेचे पदाधिकारी तसेच कवी , कवयित्री उपस्थित होते.यावेळी पर्यावरण मित्र संघटनेचे संस्थापक तांबे सर यांनी उपस्थितांना पर्यावरण संरक्षण काळाची गरज यांवर मोलाचे मार्गदर्शन केले.
उपस्थित उत्कृष्ठ कवींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवयित्री डॉ.पल्लवी परुळेकर – बनसोडे यांनी स्वीकारले तसेच सूत्रसंचालन कवी योगेश नंदा तुकाराम गोतारणे सर व आभार कवी विजय चोघळा सर यांनी केले.

Leave a Reply

Back to top button