Maharashtra

मोठा वाघोद्यातील आंबेडकर नगरात कोरोनाचा प्रवेश कोरोना बाधित संख्या ७ वर पोहोचली

मोठा वाघोद्यातील आंबेडकर नगरात कोरोनाचा प्रवेश कोरोना बाधित संख्या ७ वर पोहोचली
कंटेंटमेंट झोनची गटविकास अधिकारी यांचेकडून पाहणी

प्रतिनिधी मुबारक तडवी

मोठा वाघोदा येथील निंभोरा रोडवरील आंबेडकर नगरातील एका ५२ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल आज ९ जुलै रोजी प्राप्त झाला असून रुग्ण रहात असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आला आहे तर बाधिताच्या कुटूंबातील १६ जणांना स्वॅब तपासणी कामी फैजपूर येथील जे टी महाजन कॉलेजातील कोविड सेंटरला क्वारंटाईन करण्यात आले आहे आहेत यामुळे कोरोनाबाधित संख्या ७ वर पोहोचल्यामुळे गावात कोरोना प्रादुर्भाव वाढून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे कोरोनामुक्त जाहीर झालेल्या मोठा वाघोदा गावात कोरोना संकटाने प्रवेश करीत गावास पुन्हा विळख्यात घेत कहरच सुरू केला आहे आणि दिवसागणिक रुग्ण संख्या झपाट्याने वाढत कोरोना बाधितांची संख्या ७ वर पोहोचली आहे तरी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्षम उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी गावकर्यांतून होत आहे तसेच कंटेंटमेंट झोनची रावेर गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे यांचेसह ग्रामसेवक नितीन महाजन ग्रामपंचायत सदस्य मुबारक तडवी पत्रकार उत्तम वाघ ,प्रकाश वायके राहुल महाजन यांनी पाहणी केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button