Chalisgaon

चैतन्यनगर गावाने पटकावला प्रथम क्रमांक :दिनकर राठोड जलयोध्दा पुरस्काराने सन्मानित…

चैतन्यनगर गावाने पटकावला प्रथम क्रमांक :दिनकर राठोड जलयोध्दा पुरस्काराने सन्मानित…

सोमनाथ माळी चाळीसगाव

Chalisgaon : तालुक्यात शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजलअभियानांतर्गत पाहिले खान्देश स्तरीय जल संमेलन २०२० येथील राजपूत मंगल कार्यालयात नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले यात शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियानात सहभाग नोंदवत करगाव ग्रामपंचायत मधून अवघ्या ८ महिने पूर्वीच विभाजन झालेल्या चैतन्य तांडा-४ ग्रामपंचायत तालुक्यातून प्रथम बक्षीस १५०००० रुपये मिळवण्याची मानकरी ठरली गावात एकूण ५४६२४ घनमीटर इतके काम झाले असून यामुळे यंदा पहिल्याच पावसात ५ कोटी ४६लाख २५ लिटर जलसाठा निर्माण झाला आहे कुठलाही राखीव निधी किंवा मोठ्या प्रमाणात कोणतेही उत्पन्न नव्हते शिवनेरी फाउंडेशन मार्गदर्शनाने गावात२०० ग्रामस्थांनी स्व खर्चातून शोषखड्डे केले स्वतःची रोपवाटिका तयार करून १२०० वेगवेगळ्या व स्थानिक जातीची रोपे तयार करण्यात आली संपुर्ण जग कोरोना शी लढत असताना चैतन्यनगर तांडा या गावाने दुष्काळाशी दोन हात करण्याचे ठरवले गावातील सुज्ञ मंडळींनी एकत्र येऊन गावाच्या आजूबाजूला असलेल्या नाल्यांचे खोलीकरण करून पाण्याचा साठा करता येईल म्हणून भूजल अभियाना अंतर्गत काम केले शिवनेरी फाउंडेशन च्या माध्यमातून गाव पाणीदार झाले त्याची प्रचिती म्हणून आज बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात झाला याप्रसंगी गावाला प्रथम क्रमांक तर मिळालाच हे काम करण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे दिनकर राठोड यांचाही जलयोध्दा म्हणून मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी चाळीसगांव तालुक्याचे लाडके कार्यसम्राट आमदारश श्री. मंगेश दादा चव्हाण शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा , सौ.प्रतिभा चव्हाण, डॉ. बी. एन. पाटील ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव , श्री दिवाकर धोटे ,उपसंचालक GSDA, श्रीमती अनुराधा पाटील भूजल तज्ञ जळगाव, श्री. उपेंद्रदादा धोंडे , सहज जलबोधकार,श्री अनिल भोकरे जिल्हा कृषी उपसंचालक जळगाव,श्री. एस. एन पाटील जीओलॉजि डिपार्टमेंट हेड जळगाव, श्री लक्ष्मीकांत साताळकर उपविभागीय अधिकारी चाळीसगाव, श्री अमोल मोरे तहसीलदार चाळीसगाव, श्री नंदकुमार वायकर गटविकास अधिकारी चाळीसगांव व तालुक्यातील सर्व जलयोध्ये उपस्थित होते. पुरस्कार चे वितरण मा श्री डॉ बि एन पाटील मु.का.अधिकारी साहेब यांचे हस्ते करण्यात आले यावेळी चैतन्य तांडा ४ च्या प्रथम महिला सरपंच मा ताईसो अनिता दिनकर राठोड ,उपसरपंच श्री आनंदा शिवराम राठोड सदस्य श्री वसंत बाबू राठोड ,श्रीमती अरुणा संदीप पवार,श्रीमती गीता साईनाथ राठोड, श्री प्रवीण वसंत चव्हाण , श्रीमती अनिता भाऊलाल चव्हाण,श्रीमती यशोदा राजेंद्र चव्हाण करगाव विकास सोसायटी चे चेयरमन श्री दिनकर धनसिंग राठोड ग्रामसेवक श्री पंकज धोंडू चव्हाण चैतन्य तांडा गावातील सर्व जलयोध्ये उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button