Mumbai

सोनू सूदचे सोशल वर्क खरच फुसका फटका..!की हे निव्वळ राजकारण..!

सोनू सूदचे सोशल वर्क खरच फुसका फटका..!की हे निव्वळ राजकारण..!

मुंबई सोनू सूद च्या प्रॉपर्टी ची चौकशी केली जात असून गेले दोन दिवस आयकर विभाग कसून चौकशी करत आहे. आयकर विभागाकडून याबाबत कोणतेही विधान आलेले नाही. रिपोर्ट्सनुसार, सोनू सूदच्या प्रॉपर्टी डीलबाबत ही चौकशी केली जात आहे. त्यामुळे विभागाने त्याच्या कार्यालयातील हॉटेलसह सहा ठिकाणी कागदपत्रांची छाननी केली. आयटी टीमने सतत 20 तास अकाउंट बुक, उत्पन्न खर्च आणि आर्थिक नोंदी तपासल्या.असून सूद चॅरिटी फाउंडेशन नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे जी शिक्षण, आरोग्य सेवा, नोकऱ्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर काम करते या संस्थेची देखील चौकशी करण्यात आली.

आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकामध्ये नमूद केले की, सोनू सुद आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी २० कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा कर चुकवला आहे. तसेच सोनूच्या चॅरीट संस्थेला २.१ कोटी रुपयांची आर्थिक मदत परदेशातून झाली होती. परंतु ही मदत गैरमार्गाने करण्यात आली होती. या व्यवहारामुळे परदेशी देणगी नियमन कायद्याचे (FCRA) उल्लंघन झाले आहे. तसेच जमा झालेला पैसा हा एका क्राऊड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवरून जमा करण्यात आला होता.

आयकर विभागाने पुढे सांगितले आहे की, सोनूने खोटेपणा करून आणि कर्जाच्या रुपात बेहिशोबी पैसा जमा केला आहे. इतकेच नाही तर सोनूने २०२० मध्ये त्याची स्वतःची सामाजिक संस्था सुरू केली. त्याच्या या संस्थेला १ एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत १८.९४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या देणग्यांच्या रक्कमेतील १.९ कोटी रुपये वेगवेगळ्या कामासाठी खर्च झाले आहेत. तर शिल्लक राहिलेले १७ कोटी रुपये अद्याप खात्यामध्ये आहेत.

सोनू सूद केवळ एक चित्रपट कलाकार नाही तर एक सामाजिक कार्यकर्ता आहे. तसेच कोरोनाच्या काळात, सोनू सूदने हजारो मजूर आणि बेघर लोकांना त्यांच्या घरी नेऊन सोडण्यासाठी आणि लॉकडाऊनच्या वेळी रेशन मदत पुरवण्यासाठी चर्चेत आला होता त्यावेळी सोनू सूदला सोशल मीडियावर मसीहा म्हटले जात होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button