मंदिरात भजन,काकडा आरतीला परवानगी द्या,हभप प्रकाश बोधले महाराज यांची मागणी
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
याबाबत सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोषारी साहेब यांना मंदिरात भजनाला परवानगी व लॉक डाऊन च्या काळातील अडचणीत आलेल्या गायक वादक इत्यादी कलावंताला शासनाने विशेष मदत करावी.
याविषयी निवेदन देताना अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश बोधले महाराज व भाजपा अध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार जी भोसले महाराज व अखिल भारतीय संन्यासी संप्रदायाचे स्वामी विश्वेश्वरानंद जी निवेदन देताना कारण की महाराष्ट्रामध्ये व संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना सारख्या संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने ठरवून दिलेल्या सर्व नियम नियमावलीचे पालन सर्व मंडळींनी केलेले आहे व करीत आहे.
परंतु सध्या लग्नविधी साठी पन्नास लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे मंगल कार्याला परवानगी देण्यात आलेली आहे अंत्यविधी साठी परवानगी देण्यात आलेली आहे ठराविक वेळेमध्ये दुकाने उघडून सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत असे असताना आमच्या छोट्या छोट्या मंदिरातील भजन पूजन काकडा आरती इत्यादी उपासनापद्धती बंद आहेत.
शासनाकडे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय ह भ प प्रकाश बोधले महाराज यांनी निवेदन देऊन देखील व मंडळाच्या जिल्ह्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही मंदिरातील भजन हरिपाठ काकडा इत्यादींना परवानगी देण्याविषयी विचार शासनाकडून आणखी झालेला नाही तसेच लॉक डाऊन च्या काळात अडचणीत असलेल्या गायक वादक छोटे छोटे प्रवचन कार इत्यादी शासनाकडून रेशनचे धान्य स्वरूपात काही रक्कम मिळावी या पद्धतीचे जिल्ह्यात जिल्ह्यातील कलेक्टर यांना निवेदन देऊनही अद्यापही त्याचा विचार झालेला नाही.
त्याचा विचार व्हावा व किमान 25 ते 50 लोकांना छोट्या छोट्या मंदिरात नित्याचे भजन-पूजन करण्याची छोटे छोटे प्रवचन करण्याची शासनाने परवानगी द्यावी व लॉक डाऊन च्या काळातील अडचणीत असलेल्या कलावंतांना शासनाने तात्काळ मदत करावी याविषयी राज्याचे राज्यपाल यांना कळकळीची विनंती करून आपणाकडून शासनास असे निर्देश मिळावेत ही विनंती करण्यात आलेली आहे व तशा प्रकारची निवेदन प्रत्यक्षात देण्यात आलेली आहे.
राज्यपाल यांच्याशी चर्चा होऊन शासनास तसे निर्देश करण्यात येतील असे आश्वासित केल्यामुळे काकडा हरिपाठ व छोटे छोटे प्रवचन इत्यादी करिता किमान 25 ते 50 लोकांना परवानगी मिळेल याची खात्री वाटते असे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश बोधले महाराज यांनी म्हटले आहे.






