Amalner

?️अमळनेर कट्टा…पोलखोल…!शासकीय नियमांना धुडकावून स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम शाळेची पालकांकडून प्रवेशासाठी पैशांसाठी मागणी..!शाळा देखील आहे सुरू..!

?️अमळनेर कट्टा…पोलखोल…!शासकीय नियमांना धुडकावून स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम शाळेची पालकांकडून प्रवेशासाठी पैशांसाठी मागणी..!शाळा देखील आहे सुरू..!

?️अमळनेर कट्टा...पोलखोल...!शासकीय नियमांना धुडकावून स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम शाळेची पालकांकडून प्रवेशासाठी पैशांसाठी मागणी..!शाळा देखील आहे सुरू..!

अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम शाळेत पहिलीच्या प्रवेशासाठी पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापन काळात आधीच शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या शासकीय आदेशांचे उल्लंघन स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम शाळेने केले आहे.विद्यार्थ्यांना आधीच परीक्षा,निकाल,प्रवेश यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर पालकांचे रोजगार बंद असल्याने शिक्षणाचा खर्च देखील करणे दुरापास्त झाले आहे. एकीकडे शासन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुरक्षित वातावरणात चांगले व दर्जेदार शिक्षण कसे उपलब्ध करून देता येईल ह्या प्रयत्नांत आहे तर दुसरीकडे संस्था चालकांची मनमानी समोर आली आहे. कोरोना काळात शाळा बंद आहेत परिणामी इतर खर्च देखील कमी आहे. या अनुषंगाने कोणत्याही शाळांनी 1 ली ते 8 वी पर्यंत फी आकारू नये हा अत्यन्त जुना शासन निर्णय आहे.आता कोरोना काळात 1 ते 10 वी पर्यंत फी न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि अश्या अत्यन्त नाजूक काळात संस्था चालकांनी मनमानी सुरू करत पालकांकडून अवाढव्य फी ची मागणी केली असल्याची निनावी तक्रार ठोस प्रहार कडे एका पालकाने केली आहे. तसेच विना गणवेश विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले जात असल्याचेही नमूद केले आहे.कोव्हिडं नियमांचे उल्लंघन करत शाळा सुरू असल्याची तक्रार केली आहे.
सदर पत्र हे निनावी आहे पण त्यात पालकाची मजबुरी देखील दिसून येत आहे. जर नावानिशी तक्रार केली असती तर त्यांच्या पाल्याला प्रवेश मिळणार नाही अशी धास्ती व दहशत त्यांच्या मनात आहे.म्हणून त्यांनी त्यांचे म्हणणे अत्यन्त स्पष्ट व भाव पूर्ण शब्दात मांडले आहे. या वर आता गट शिक्षण अधिकारी लक्ष देतील का? व शाळे वर कार्यवाही होणे आवश्यक आहे. सामान्य गरीब विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी शाळेचे,शिक्षणाचे दरवाजे खुले झाले पाहिजेत हीच अपेक्षा आहे. सदर तक्रारीची दखल स्थानिक पातळीवर न घेतली गेल्यास शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कडे ही तक्रार रवाना करणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button