Mumbai

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न

मुंबई

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. मंत्री श्री चंद्रकांत पाटील, श्री गिरीश महाजन, श्री सुभाष देशमुख, डॉ अनिल बोंडे, श्री सदाभाऊ खोत, श्री विजय शिवतारे, डॉ सुरेश खाडे, श्री महादेव जानकर उपस्थित होते. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. प्रत्यक्ष स्थितीचे अवलोकन करून मदतीचा तपशील लवकरच ठरवावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

याव्यतिरिक्त विमा कंपन्यांकडून सुद्धा मदत देण्यासंबंधी सरकार त्यांच्या संपर्कात आहे. पंचनाम्यांच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. मोबाईलने घेतलेल्या छायाचित्रांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करीत आहोत, परंतु त्याची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून मदत करेल, असेही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button