तपसे चिंचोलीचा भाजीपाला उत्पादक शेतकरी मैनू पठाण आला दुहेरी संकटात
कोरोना लॉकडाऊन मुळे बंद बाजारपेठा मुळे भाजीपाला शेतातच लागला सड
प्रतिनिधी प्रशांत नेटके
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून त्यावर निर्बंध सरकारच्या वतीने लॉकडाऊन पाळण्यात आल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी ते २५ हजार रुपये खर्च केला आहे,लॉक डाऊन मुळे बंद बाजारापेठा यामुळे त्यांना पाच ते दहा हजार रुपये तरी मिळतील की नाही याची शंका आहे.
मैनू पठाण यांच्यासारखी स्थिती औसा तालुक्यातील सर्वच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची आहे.
दुष्काळ आणि गारपीट या नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता कोरोनाचं नवं संकट उभं राहिलं आहे. भाजीपाला मातीमोल भावाने विकावा लागत आहे. मात्र या परिस्थितीचा फायदा घेऊन काही व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आठवडी बाजार बंद झाल्याने किरकोळ विक्रेते देखील अडचणीत आहे.
भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यावर आर्थिक संकट आले आहे. यावर्षी निसर्गाने साथ दिली , रब्बी हंगामात पुरेसे पाणी उपलब्ध होते. मात्र कोरोनाचं संकट आल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
*”कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लाॅकडाऊन असल्यामुळे भाजीपाला विक्री होत नसून टॉमेटो, वांगी, मिरची या भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला लागवडीसाठी झालेला खर्चही वसूल झालेला नाही. भाजीपाला विकून आम्ही दोघे भाऊ आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. माञ आत्ता आठवडे बाजार, मार्केट बंद असल्यामुळे माल विकला जात नाही. यामुळे भाजीपाला शेतातच सडून खराब होत आहे. कृषीविभागाने आमच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून आम्हाला योग्य ती मदत मिळवून द्यावी “*, अशी माहिती भाजीपाला शेतकरी मैनू पठाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.






