1मे कामगार दिन महाराष्ट्र दिन विशेष
कोरोना साथ काळात कामगार वर्ग व मराठी जनतेच्या हक्कावर बाधा नको का अमृत महाजन (जळगाव )उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आयटक
प्रतिनीधी लतिश जैन
आपण १ मे हा दिवस “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. त्या बरोबर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो कारण १९५६साली भाषा भाषावार पुनर्रचना समितीने महाराष्ट्राला मुंबई ही औद्योगिक मराठी भाषिक शहर न देण्याचे ठरवल्याने महाराष्ट्रभर असंतोष माजला..
मराठी भाषिकांसाठी मुंबई हे शहर आत्मा होते म्हणून महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र आले त्यात सेनापती बापट कॉम्रेड डांगे एस एम जोशी पत्रकार प्र के अत्रे प्रबोधनकार ठाकरे दादासाहेब गायकवाड आदि नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समिती ची स्थापना केली व मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणा देऊन महाराष्ट्रभर मराठी भाषिकांच्या आंदोलन उभारले त्यावेळी शाहीर अमर शेख अण्णाभाऊ साठे.. दत्ता गव्हाणकर यांच्या क्रांतिकारी गीतांनी महाराष्ट्रभर चेतना निर्माण झाली व संयुक्त महाराष्ट्र आंदोलन पेटले फ्लोरा फाउंटन (आजचा हुतात्मा चौक) येथे जी प्रचंड कामगार जनतेची प्रचंड मिरवणूक झाली त्यावर तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई सरकारने गोळीबार केला त्यात 105 हुतात्मे झाले त्या हुतात्म्यांच्या बलिदानातून केंद्र सरकार नमले व त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश तत्कालीन केंद्रीय नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात 1 मे1960 रोजी आणला व मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला..
तेव्हा यात मुंबईतील गिरणी कामगार व लाल बावटा अग्रेसर होता म्हणून “जागतिक कामगार दिन” हा जगातील कामगारांचे दृष्टीने जसा महत्वाचा तसाच पुरोगामी महाराष्ट्राचे दृस्टीनेही महत्वाचा आहे यशवंतराव चव्हाण म्हणत, “समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र ” म्हणून 1मे कामगार दिवस व महाराष्ट्र दिन याची पूर्वपीठिका समजली पाहिजे . त्यासाठीच ते थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न आहे
दरवर्षी जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील 100हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. तसेच १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो.
*कामगार दिन कसा सुरू झाला?*
औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने (इंटरनॅशनल) झालीत 2nd ईंटर्नशनलने१८९०पासून १ मे हा कामगारदिन पाळण्याचा निर्णय घेतला
*कामगारांच्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या :*-
१. कायद्याने ८ तासांचा दिवस
२. लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी
३. महिला कामगारांना सुविधा
४. रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम
५. कायद्याने साप्ताहिक सुट्टी
६. कामाचा मोबदला.. वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा.
७. समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य. कामगारांच्या प्रमुख मागन्या होत्या
जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगातील ८० देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. युनोनेही या कामगार दिनाला रीतसर मान्यता दिली आहे. उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणार्या कामगारांचा गौरव करण्यात येतो.
अनेक वर्षानंतर अधिकाधिक देशांतले कामगार १ मे दीनाच्या सोहळ्यात सामील होत गेले आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिन साजरा करु लागले. *१ मे दिवस आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला*. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १मे होऊ लागला. . १९०५ च्या १ मे या दिवसासाठी लेनिनने लिहिलेल्या पत्रकात म्हटले होते, *“*कामगार कामगारात, राष्ट्राराष्ट्रात, धर्माधर्मात असणारे शत्रुत्व नष्ट करा*. *या शत्रुत्वाने फक्त लुटारूंचा आणि जुलूमशहांचाच फायदा होतो, कारण ते कामगारवर्गातील अज्ञानावर आणि दुफळीवरच जगत असतात*. *ज्यू आणि ख्रिश्चन, फिन आणि स्वीडश, आर्मेनियन आणि तातार, पोलिश आणि रशियन, ल्याटिन आणि जर्मन सारे (आपण भारतीय हिंदू मुस्लिम दलित सवर्ण भेदभाव विसरून)भेदभाव विसरून समाजवादाच्या एका झेंडयाखाली आपण सारे आगेकूच करूया*.* सर्व देशातील कामगारांची ही ऐक्यशक्ती, आंतरराष्ट्रीय समाजवादाची संघशक्ती, १ मे दिनाला आपल्या दलांची पाहणी करते आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यासाठीचा लढा निर्धाराने आणि अविचलपणे पुढे नेण्यासाठी आपले बल संघटीत करते.” भारतात पहिला कामगार दिवस मद्रास शहरात( हल्ली चेन्नई शहरात) एम सिंगारवेलू चॅटटीयार ह्यांच्या लेबर किसान पार्टीने यांनी मद्रास उच्च न्यायालय समोरील जागेत लाल बावटा फडकवून साजरा केला.. त्यावेळी वापरण्यात आलेले बोधचिन्ह.. शिल्प म्हणून चेन्नईच्या समुद्रकिनार्यावर आजही दिमाखाने उभा आहे
त्यानंतर वर्षे लोटली !!कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला सरकारी/ निमसरकारीसहकारी/महिलावर्ग तसेच असंघटित कामगार असा कामगार एकजुटीचा विस्तार होऊन देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिवस साजरा करीत आहेत आणि १ मे दिवस आंतरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला आहे. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या विरोधात लढतांना दोन धर्मांत तेढ निर्माण करणाऱ्या सत्ताधारी शक्ती व संस्था यांच्या चकरव्ह्यूहात कामगारांनी फसू नये अशी अपेक्षा करताना सध्या करून वायरस साथीने जी लोकडोवन सुरू आहे त्यात कामगारांचा रोजगार.. किमान वेतन ..पेन्शन..सामाजिक सुरक्षा.आरोग्य संरक्षण व.जीवन जगण्याचा अधिकार ना बाध येऊ नये म्हणून सरकार पातळीवरून उपाययोजनेसाठी दक्ष राहावे हीच यावर्षी चा 1मे कामगार दिन /महाराष्ट्र दिना ची हाक आहे






