Rawer

भुसावळ मुस्लिम नुमाइंदा काऊंसिलतर्फे ५०० प्रवाशांना जेवण

भुसावळ मुस्लिम नुमाइंदा काऊंसिलतर्फे ५०० प्रवाशांना जेवण

रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ-येथील रेल्वे स्थानकावर नवीदिल्ली येथून आलेल्‍या विशेष रेल्‍वे गाडीतील सुमारे ५०० विद्‍यार्थ्‍यांना भुसावळ रेल्‍वे स्‍थानकावर गाडी आल्‍यानंतर जेवणाची सुविधा भुसावळ मुस्लिम नुमाइंदा काऊंसिलतर्फे करण्‍यात आली.

लॉकडाऊन मुळे सर्व हाॅटेल्स, स्टॉल्स बंद असून त्‍यामुळे जेवणासाठी गाडीने प्रवास करून आलेल्‍या विद्‍यार्थ्‍यांना त्रास होऊ नये म्‍हणुन मुस्लिम नुमाइंदा काऊंसिलतर्फे पूरी भाजी,केळी, पाणी बाटल्या,ओआरएस पावडर वाटप करण्‍यात आले.

प्रवासी विद्‍यार्थ्‍यांनी व्‍हीडियो व सेल्फी घेऊन आनंद व्‍यक्‍त केले तसेच त्‍यांनी व शासकीय अधिकारी यांनी मुस्लिम नुमाइंदा काऊंसिलची प्रशंसा व आभार व्‍यक्‍त केले.

काऊंसिलचे अध्यक्ष श्री.फरहान यांनी सांगितले कि, काऊंसिल कोरोना महामारी संकटाच्‍या काळात देशहितार्थ सर्व जाति धर्मासाठी मानवतेच्‍या दृष्‍टीकोणातून काम करीत आहे.

काऊंसिलच्‍या सर्व सदस्‍यांनी रेल्‍वे गाडी येण्‍याच्‍या एक तास अगोदर स्‍थानकावर येऊन गाडी तीन तास उशिराने आल्‍यावरही रोजे उपवास असतांना सुध्‍दा कार्य करीत होते. सोबतच रेल्‍वे स्थानकावर उपस्‍थित गरीब,बेवारस,अन्‍य प्रवासी,बस चालक व वाहक यांनाही सुविधा पुरवण्‍यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button