Amalner

प्रा.हिरालाल पाटील यांना राज्यस्तरीय युवक मित्र पुरस्कार जाहीर

प्रा.हिरालाल पाटील यांना राज्यस्तरीय युवक मित्र पुरस्कार जाहीर

अमळनेर : अमळनेर येथून जवळच असलेल्या कळमसरे ता.अमळनेर येथील रहिवासी व वसंतनगर येथील उच्च माध्यमिक आश्रम शाळेलतील उपक्रमशील प्राध्यापक हिरालाल पाटील यांना ‘युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य’या युवा चळवळीमार्फ़त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ,पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र त्यांना कालच प्राप्त झाले आहे
राज्यात युवा चळवळीत कार्य करणाऱ्या युवकमित्र परिवारातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय युवा संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी संमेलनात राज्यातील पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ‘युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य’या युवा चळवळीमार्फ़त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यात कळमसरे ता.अमळनेर येथील पत्रकार प्रा.हिरालाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक १० जानेवारी रोजी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर,पुणे येथे’ सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,पुस्तक व गुलाबपुष्प’ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. चार वर्षांपूर्वी पूर्वी प्रा.हिरालाल पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या या निवडीबद्दल वसंतराव नाईक ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव,प्राचार्य डी एम पाटील ,मुख्याध्यापक सोपान पाटील ,वसंतराव पाटील,कुंदन खैरनार, विजय पाटील, चंद्रकांत पाटील, शशिकांत पाटील, महेंद्र रामोशी ,जितेंद्र ठाकूर ,संजय पाटील, संभाजी देवरे,गौरवकुमार पाटील,गजानन पाटील,विलास पाटील,यदुविर पाटील,गौतम बिराडे व कळमसरेसह परिसरातील मित्र परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button