Amalner: अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले.. गुन्हा दाखल
अमळनेर अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील जैतपीर येथे घडली. मारवड पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जैतपीर येथील १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला 4 नोव्हे रोजी रात्री तिच्या आईवडिलांनी नातेवाईक आल्याने आजी आजोबांच्या घरी झोपायला पाठवले होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास ती परसाकडे जाऊन येते असे सांगून घरातून निघाली. मात्र बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही.बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आई वडील व नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र कोणताही तपास लागला नाही.शेवटी तिच्या आईने मारवड पोलिसांत तक्रार दिली असून पुढील तपास हे.कॉ.सचिन निकम करत आहे.






