Amalner

Amalner: सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात पद्मश्री डॉ एस.आर.रंगनाथन यांची जयंती ग्रंथालय दिवस म्हणून साजरा

Amalner: सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात पद्मश्री डॉ एस.आर.रंगनाथन यांची जयंती ग्रंथालय दिवस म्हणून साजरा

अमळनेर प्रतिनिधी
पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे ग्रंथालय चळवळीचे निर्माते डॉ पद्मश्री एस आर रंगनाथन यांची जयंती ‘ग्रंथालय दिन’ म्हणून साजरी करण्यात आला.
ग्रंथालय व ग्रंथालयशास्र शिक्षणाची गरज जगाला करून देणारे हिंदुस्थानी ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्श्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 130वी जयंती 9 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली.
9 ऑगस्ट हा दिवस ग्रंथालय दिन’ म्हणून ओळखला जातो. 12 ऑँगस्ट हा दिवस संपूर्ण देशात ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा केिला जातो. ग्रंथालयांना
जास्तीत जास्त लोकाभिमुख बनवणे त्यांचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा
यासाठी त्यांनी तयार केलेल्या या पंचसूत्रीवर आज ग्रंथालय शास्त्राचा पाया रचला गेला आहे त्यासाठी साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात ग्रंथालय दिनानिमित्ताने उद्बोधन पर कार्यक्रम घेण्यात आला यावेळी डॉ.एस.आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन वाचनालयाच्या उपाध्यक्षा डॉ माधुरी भांडारकर यांनी केले तर चिटणीस प्रकाश वाघ यांनी माल्यार्पण केले.
यावेळी संयुक्त चिटणीस सुमित धाडकर ,ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव ,पी एन भादलीकर ,प्रसाद जोशी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर वाचनालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसाद जोशी यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button