Amalner: मतदान केले आणि घेतला शेवटचा श्वास…
अमळनेर तालुक्यात दि. 20 रोजी विधानसभा निवडणूक पार पडली. यात अनेक अबाल वृद्धांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सुंदरपट्टी येथील ७१ वर्षाच्या मधुकर पाटील यांनी मतदान केले.मतदान कक्षातून बाहेर आल्या बरोबर काही मिनिटात मतदान केंद्राबाहेरच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मधुकर संतोष पाटील यांना दोन मुली आहेत आणि दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. पत्नी मयत आहे. 20 तारखेला मतदान कक्षात जाऊन मतदान केल्यानन्तर बाहेर आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे केंद्राबाहेर त्यांना खाली बसवण्यात आले. जवळच्या लोकांनी त्यांना पाणी पाजून थोडे चालून पुढे नेल्यावर त्यांचा झाडाखाली मृत्यू झाला. २१ रोजी सकाळी त्यांची अंत्ययात्रा झाली. त्यांच्या नातूने त्यांना अग्निडाग दिला.






