बोदवडात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपनगराध्यक्षांच्या भावासह पाच जणांवर गुन्हा दाखल
बोदवड :- जिल्हाधिकाच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया साहितांचे कलम १४४ प्रमाणे सध्या कोरोना विषारी संसर्गजन्य विषाणू आजारापासून नागरिकांचे संरक्षण करिता जमाव बंदी, संचार बंदी, जिल्हा बंदी असताना आदेशाच पालन न करता शहरात सार्वजनिक ठिकाणी आठवडे बाजार भरवून तोंडाला मास्क न लावता मानवी जीवित व व्यक्तिगत आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरवण्याची घातक कृती करून आदेशाच उल्लंघन करताना दिसून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवड शहरात दिनांक १ जुलै बुधवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी आठवडे बाजार भरवुन मानवी जीविताचे आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य करून आदेशाच उल्लंघन करीत असताना दिसून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बोदवड नगरपंचायत चे कार्यलयीन अधीक्षक राजुसिंग चव्हाण यांच्या फिर्यादी वरून ५ जणांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरील सर्वांनी या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कालीचरण बिर्हाडे हे करीत आहेत.
आरोपी उपनगराध्यक्षांचा भाऊ योगेश नारायण माळी (वय ३५) यांच्यासह आर. एन. बागवान, शाहरुख खान मज्जीद खान, सै अरबाज सै रहीम बागवान व रामदास रामचंद्र तुरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.






