Ausa

लामजना येथील अंगणवाडी मध्ये महिला दिन साजरा

लामजना येथील अंगणवाडी मध्ये महिला दिन साजरा

प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:-
औसा तालुक्यातील लामजना येथील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित प्रहार पक्षाचे उपतालुका प्रमुख तानाजी कांबळे, अंगणवाडी कार्यकर्ती शोभा कांबळे,पंचशीला गायकवाड, रेखा माने, मंगल माने,सुनीता शेळके,राजश्री धावरे तसेच गावातील महिला भगिनी आणि किशोरवयीन मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रथमतः क्रांतिज्योती, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
यानिमित्ताने लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी गावातील महिला,किशोरवयीन मुली,शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button