Mumbai

नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त श्री. प्रवीणकुमार पाटील यांना राष्ट्रपती पदक जाहीर.

नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त श्री. प्रवीणकुमार पाटील यांना राष्ट्रपती पदक जाहीर. पी व्ही आनंद मुंबई मुंबई : महाराष्ट्रातील 21 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे त्यात तालुक्यातील कावपिंपरी येथील रहिवासी आणि सध्या नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले प्रवीणकुमार पाटील यांचा समावेश आहे. श्री पाटील यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पदक मिळाले आहे. 26/11 च्या हल्ल्यात कसाबला ऑर्थर रोड जेलमधून येरवडा जेलमध्ये नेण्यासाठी अमलात आणलेल्या ऑपरेशन एक्स मध्ये श्री पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती तसेच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाळू आणि जमीन माफिया आळा घालण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रखरपणे उपाययोजना आखल्या होत्या. नानविज दौंड येथे पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून काम करत असताना त्यांनी दुर्लक्षित असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रात नंबर एकवर आणून सदर पोलीस प्रशिक्षण केंद्राचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला. त्याकाळात काळात त्यांनी सुमारे पंधराशे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. लातूर उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यांना प्रतिबंध घातला आणि त्यांचा उपविभाग जिल्ह्यात एक नंबर ठेवला. अशा अनेक महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्यामुळे कावपिंप्रीत आनंदाचे वातावण असून गावासह परिसरातून श्री पाटील यांचे कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button