Chandwad

Chandwad: चांदवड मतदारसंघात शिरीषभाऊ कोतवालांच्या विजयासाठी सुप्त लाट?

Chandwad: चांदवड मतदारसंघात शिरीषभाऊ कोतवालांच्या विजयासाठी सुप्त लाट?

चांदवड प्रतिनिधी

चांदवड देवळा मतदारसंघात प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे.खासदार निवडणुकीत 2 खासदार निवडून आणण्यात शिरिषभाऊ कोतवाल यांचा सिंहाचा वाटा होता,त्यांच्याकडे काँग्रेसचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद आहे. महाविकास आघाडी कडून काँग्रेसच्या तिकिटावर उभे असलेले माजी आमदार शिरिषभाऊ कोतवाल यांनी आजपावेतो 7 वेळा विधानसभा लढवून त्यापैकी 2 वेळा विजय प्राप्त केला होता.चांदवड देवळा संलग्न झाल्यावर मात्र देवळ्याकडे आमदारकी गेली होती.यावेळी मात्र आमदार राहुल आहेर यांचे चुलत बंधू केदानाना आहेर यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने मत विभाजन होणार हे निश्चित! त्यातच कोतवाल यांनी सुरुवातीपासूनच अतिशय मायक्रो नियोजन करत निवडणुकीस सुरुवात केलेली आहे. यावेळच्या निवडणुकीत ज्येष्ठ,श्रेष्ठ,सुज्ञ यांची लाट अप्रत्यक्षपणे कोतवालांच्या मागे असून अतिशय पद्धतशीरपणे आमदारकीची विजयश्री पुन्हा चांदवडकडे येणार असे चित्र दिसून येत आहे. गेल्या 10 वर्षात काही प्रती आमदार तयार झालेले असून गेल्या 2 टर्म पासूनचे सध्याचे आमदार हे नाशिकला राहत असल्याने सोमवार किंवा मध्यात केव्हातरी चांदवडला येतात,त्यातच ठेकेदार,गोल्डन गँग सदस्य असे प्रती आमदार अनेक तयार झालेले असून ते आमदारांपर्यंत सामान्य नागरिकांना पोहोचू देत नाही अशी खंत काही तरुणांनी ग्रामीण भागात व्यक्त केली.आमच्या प्रतिनिधींनी शहरी तसेच ग्रामीण भागात आढावा घेतला असता यंदा मतदार आश्वासनांना बळी न पडता विचार विनिमय करूनच आमदार निवडतील अशी आशा ज्येष्ठांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button