?️ अमळनेर कट्टा…अमळनेर न.पा.सभागृहात सभापती निवड प्रसंगी प्रथमच क्रांतिसूर्य महात्मा फुले सभागृह म्हणुन उल्लेख समस्त फुले-शाहू-आंबेडकर जनतेचा सन्मान ..प्रविण महाजन
अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेच्या विविध सभापती पदाच्या निवड प्रसंगी प्रशासनाकडून प्रथमच अमळनेर नगरपरिषद क्रांतिसूर्य महात्मा फुले सभागृह असा उल्लेख करण्यात आला असून समस्त फुले-शाहू-आंबेडकर जनतेचा सन्मान आहे. लवकरच नामकरण करावा व क्रांतिसूर्य महात्मा फुले क्रांतीज्योती सवित्रीमाई फुले यांच्या मोठ्या प्रतिमा सभागृहात सन्मानाने बसवण्यात याव्यात असे क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच चे संस्थापक प्रमुख प्रवीण बी.महाजन यांनी सभागृहास महात्मा फुले यांचा उल्लेख झाल्याने प्रतिक्रिया दिली आहे.
राजमाता जिजाऊ जयंती दिनी मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड व नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांना क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच तर्फे निवेदन देऊन स्वाक्षरी अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. सभागृहास महात्मा फुले नामांतराचा ठराव मंजूर असून अंमलबजावणी व्हावी म्हणून क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच तर्फे स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे.तसेच वेळो वेळी पाठपुरावा केला आहे.प्रथमच अमळनेर नगरपरिषद सभागृहास क्रांतिसूर्य महात्मा फुले सभागृह उल्लेख झाल्याने समस्त फुले-शाहू-आंबेडकर जनतेचा सन्मान झालेला आहे.क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंच तर्फे जिजाऊ जयंती ते गणराज्य दिन अभियान राबवण्यात येतअसून अभियान दरम्यान सभागृहाचा उल्लेख झाल्याने महात्मा फुले विचारमंच तर्फे स्वागताचा ठराव त्वरित करू तसेच लवकरच सभागृहास क्रांतिसूर्य महात्मा फुले नाव द्यावे व फुले दाम्पत्य यांचे स्मारक लवकर व्हावे असेही क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच चे संस्थापक माळी महासंघाचे प्रदेश संघटक प्रवीण बी.महाजन यांनी सांगितले आहे.






