India

? मोठी बातमी….काय आहे मुलींच्या हक्काचं रक्षण करणारा निर्णय..!उच्च न्यायालयाने दिले आदेश..!

? मोठी बातमी….काय आहे मुलींच्या हक्काचं रक्षण करणारा निर्णय..!उच्च न्यायालयाने दिले आदेश..!

मध्यप्रदेशातील जबलपूर हायकोर्टानं मुलींच्या हक्काचं रक्षण करणारा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. हायकोर्टानं म्हटलं, की लग्न झालेली मुलगीही अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी पात्र आहे. नव्हे तो तिचा हक्कच आहे. (Married Daughter Eligible For Compassionate Appointment)
या आदेशात कोर्टानं स्पष्ट म्हटलं आहे, की एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मागे त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांमध्ये बेरोजगार मुलगा नसेल तर मुलगीही अर्ज करू शकते. तिचं लग्न झालेलं आहे की ती अविवाहित आहे यानं काहीच फरक पडत नाही.
सतना इथं राहणाऱ्या प्रीति सिंह हिनं हायकोर्टात जनहित याचिका केली होती.
वकील अनिरुद्ध पांडे यांनी तिची बाजू मंडळी. याचिकेमध्ये प्रीतिनं सांगितलं, की तिची आई मोहिनी सिंह कोलगवा पोलीस स्थानकात एएसआयच्या पदावर कार्यरत होती. 23 ऑक्टोबर 2014 रोजी सकाळी नोकरीवर जाताना रस्त्यावरच्या अपघातात तिचा मृत्यू झाला.
यानंतर प्रीति सिंहनं अनुकंपा तत्वावरच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. भोपाळ पोलिस मुख्यालयानं तिचा राज फेटाळत म्हटलं होतं, की लग्न झालेली मुलगी अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी पात्र असू शकत नाही. तिला तो हक्क पोचत नाही.
मुलींसाठी मोलाचा ठरेल निर्णय
न्यायाधीश संजय द्विवेदी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यादरम्यान प्रीती सिंहच्या वकिलानं बाजू मांडली, की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद – 14 मध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे. याच कारणानं अनुकंपा नियुक्तीबाबतही भेदभाव केला जाऊ शकत नाही. लग्न झालेल्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकते तर मग मुलीला का नाही?
कोर्टानं प्रीति सिंहच्या वकिलांच्या मांडणीला दुजोरा देत प्रीतिला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे आदेश दिले. या आदेशात म्हटलेलं आहे, की याचिकाकर्ता विवाहित असली तरी तिला अनुकंपा तत्वावर नोकरी दिली गेली पाहिजे.
आता हा आदेश अनेक मुलींसाठी लाखमोलाचा आशीर्वाद ठरणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button