Motha Waghoda

मोठा वाघोद्या जवळ काल झालेल्या अपघातातील मोटर सायकलस्वाराचा मृत्यू

मोठा वाघोद्या जवळ काल झालेल्या अपघातातील मोटर सायकलस्वाराचा मृत्यूमोठा वाघोदा प्रतिनिधी …मुबारक तडवीअंकलेश्वर बुरह्मनपुर महामार्गावर रावेर रस्तावरच्या अपघात वळणावर काल भीषण अपघात झाला. यात समोरुन येणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एम एच 14 बीपी 9604 व मारुती ओमनी कार MH19 एक्स 7512 यांची समोरासमोर धडक झाली.मोठा वाघोद्या जवळ काल झालेल्या अपघातातील मोटर सायकलस्वाराचा मृत्यूत्यात मोटरसायकलस्वार समाधान उखडू वाघोदे राहणार मोरगाव तालुका रावेर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले होते मात्र एक दिवसाच्या उपचारानंतर पहाटे पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला 28 रोजी सायंकाळीा झालेल्या अपघाती घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला कॉल करून कळवले मात्र रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू न शकल्याने लोकसेवक माजी आमदार हरिभाऊ जावळे यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णवाहिकेतून जखमीला खासगी दवाखान्यात उपचारार्थ नेण्यात आले. मोठा वाघोदा ते सुखी नदी दरम्यान दोन किमी अंतरात दोन अपघाती वळण आहेत याच वळणावर दोन्ही बाजूने काटेरी झुडपे आठ ते दहा फूट उंच वाढलेले आहे त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवत असताना समोर दिसत नसल्याने अचानक वाहन समोरून न दिसल्याने वाहनावरील ताबा सुटून लहान-मोठे अपघात घडत आहेत घटनास्थळी सावदा पोलिस स्टेशनचे कर्मचारी व मोठे वाघोदा ग्रामस्थ यांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली व घटनास्थळ पंचनामा केला होता तसेच मारुती ओमनी एमएच 19 एएक्स 7512 चा चालक विशाल राजू पाटील व 31 वर्ष राहणार शेंदुर्णी तालुका जामनेर स्वतः सावदा पोलीस स्टेशनात हजर झाला आहे पुढील कार्यवाही कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मोठा वाघोदा जवळील अपघात ग्रस्ताचा मृत्यू

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button