उमरगा

बदलत्या काळात बुध्दाच्या विचाराशीवाय पर्याय नाही—प्रा.राजा जगताप

बदलत्या काळात बुध्दाच्या विचाराशीवाय पर्याय नाही—प्रा.राजा जगताप

राहुल खरात
आजच्या बदलत्या काळात माणुसकी कमी होत चालली आहे.माणसं एकमेकांशी वैरानं वागत आहेत.पैशाच्या मागे धावत आहेत त्यातूनच व्यसनाधिनता,अत्याचार,चो—या ,हाणामा—या सातत्याने घडताहेत वाढती बेकारी आणि त्यातून वाढत चाललेली नैराशाची भावना यामुळे समाजातील माणसात तानतनाव वाढले जात आहेत आजच्या बदलत्या काळात सुखी,समाधानी जीवन जगायचे असेल आणि समाजा,समाजात शांतता निर्माण करायची असेल तर बुध्दाचा शांततेचा,करूणेचा,मैञीचा विचार स्विकारला पाहिजे.जगातील वाढत्या दहशतवादाने एक भितीचे वातावरण तयार झाले आहे,त्यामुळे जगण्याची शास्वती राहीली नाही त्यासाठी आजच्या बदलत्या काळात बुध्दाच्या विचाराशीवाय पर्याय नाही असे प्रतिपादन भारतीय बौध्द महासभा उमरगा यांचे वतिने आज दि.८आॅक्टोंबर रोजी “६३व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने “१९५६नंतर धम्म चळवळ दशा आणि दिशा”या विषयावर व्याख्याना प्रसंगी उस्मानाबाद येथील प्रा.राजा जगताप(गाव तेथे बुध्द विहार कादंबरी लेखक)यांनी केले आहे.
प्रारंभी प्रमुख पाहुणे प्रा.राजा जगताप यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुध्द यांचे प्रतिमाचे पूजन केले यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हरी सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण केला.भारतीय बौध्द महासभेच्या कार्यकर्ते यांनी वंदना घेतली समता सैनिक दलाच्या सैनिकांनी नियोजनात चांगली भुमिका बजावली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश भालेराव होते यावेळी मंचावर दिलीप गायकवाड(भारतीय बोध्द महासभा जिल्हा उपाध्यक्ष),रामलिंगदादा गायकवाड उपस्थित होते.प्रस्ताविक समता सैनिक दलाचे आयु.निखिल गायकवाड यांनी केले यावेळी त्यांनी गेल्या तीन वर्षे बौध्द महासभेने घेतलेल्या उपक्रमाचा लेखाजोखा मांडला.

पुढे बोलतांना प्रा.राजा जगताप म्हणाले की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी माणसांने, माणसाला, माणसासारखे वागवावे. यासाठी आपल्या विद्वतेच्या व संघटन कौशल्याच्या बळावर दलित बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक लढे लढले,मुकनायक,बहिष्कृत भारत,जनता,समता,प्रबुध्दभारत या व्रतपञातून दलितांच्या व्यथा मांडल्या,इंग्रज सरकारला निवेदने दिली तरीही न्याय मिळत नसल्याने त्यांनी येवले येथे १३आॅक्टोंबर १९३५ला धर्मांतराची केलेली घोषणा १४आॅक्टोंबर१९५६ला नागपूर येथे स्वत:बुध्द धम्माची दीक्षा घेतली व पाच लाख अनुयायांना बुध्द धम्म दिला.त्यामुळे येथल्या अस्पृश समाजाला आज सन्मान मिळाला आज६३व्या धम्म चक्र पवर्तन दिनी आपण बुध्दांच्या शांततेच्या मार्गाने चालावे व त्यांच्या मैञीभावाला वाढवावे व समाज आणि तरूणांना आजच्या काळात सुसंस्कारित बनवायचे असेल तर बुध्दाच्या विचाराशीवाय पर्याय नाही.यासाठी भारतीय बौध्द महासभेच्या कार्यकर्त्यांचा,आदरणीय बोध्द भिक्खूंचा,समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.या कार्यक्रमाला मिलिंद डोईबळे,बालाजी गायकवाड,दिलिप गायकवाड,यांनी सहकार्य केले.सूञसंचालन प्रा.संजय कांबळे यांनी केले तर आभार उमरगा तालुका भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे यांनी मानले.या कार्यक्रमाला उमरगा शहरातील व ग्रामीण भागातील बौध्द बांधव तसेच प्राध्यापक,शिक्षक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button