Nandurbar

धडगांव येथील देवमोगरा मेडिकलवर मुदतबाह्य औषधे विक्री करणार्यां औषधविक्रेत्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, अन्यथा आंदोलन

धडगांव येथील देवमोगरा मेडिकलवर मुदतबाह्य औषधे विक्री करणार्यां औषधविक्रेत्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, अन्यथा आंदोलन

धडगांव : देवमोगरा मेडिकल धडगांव येथे मुदतबाह्य औषधांची विक्री करणार्यां औषधविक्रेत्यावर गुन्हा दाखल करून अटक करा व तात्काळ परवाना रद्द करा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्य मंञी राजेश टोपे,अन्न औषध पुरवठा मंञी छगन भुजबळ,जिल्हाधिकारी नंदुरबार राजेंद्र भारूड यांच्या कडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धडगांव या आदिवासी तालुक्यात देवमोगरा मेडिकल व जनरल स्टोअर्स दुकानात औषधविक्रेत्याने मुदतबाह्य औषधे विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने सदर दुकानाची 61 दिवस परवाना रद्दची कारवाई केली होती. परवाना निलंबित कालावधी सुरू असतानाच 18 मार्च रोजी सदर औषधविक्रेते यांनी मंत्रालयात जाऊन वशिल्याने परवाना स्थगिती आदेश आणला आहे. आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार असतानाच पुन्हा दुसर्यांचा याच औषधविक्रेत्याने मुदतबाह्य औषधे विक्री केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यापूर्वीही मुदतबाह्य औषधे विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे सहाय्यक आयुक्त यांच्या कडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार अन्न व औषध प्रशासन धुळे यांनी सदर दुकानाचा 61 दिवस परवाना रद्द केला होता. या आदेश विरोधात राज्य आरोग्य मंत्री यांच्या कडे अपिल दाखल करून दुकानदाराने स्थगिती आदेश मिळवला.हा आदेश 2 फेब्रुवारी पासून सुरु झाला. याच कालावधीत सुरवाणी तालुका धडगांव येथील एका ग्राहकाला मुदतबाह्य त्वचारोगाचे औषध विक्री केल्याचा प्रकार घडला आहे. औषधावर सन 2019 ची अंतिम तारीख होती. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा या प्रकरणाची चौकशी करत पाहणी केली आहे. मात्र अद्याप संबंधित औषधं विक्रेत्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.
महोदय, सदर औषध विक्रेत्यांकडून वारंवार मुदतबाह्य औषधे विक्री होत असल्यामुळे धडगांव येथील गरीब व अडाणी लोकांची फसवणूक होऊन आरोग्याशी खिलवाड केला जात आहे. सदर प्रकार हा अत्यंत गंभीर असून मुदतबाह्य औषधाच्या वापराने रोगी व ग्राहकांवर विपरीत परिणाम होऊन लोक मरू शकतात. तेव्हा गरीब व अडाणी लोकांच्या आरोग्याशी खिलवाड करणार्यां देवमोगरा मेडिकल व जनरल स्टोअर्स धडगांव तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार या दुकानातील औषधविक्रेत्यावर गुन्हा दाखल करून अटक करा व तात्काळ दुकानाचा परवाना रद्द करा.हीच नम्र विनंती. अन्यथा याविरोधात बिरसा क्रांती दल सह इतर आदिवासी संघटना तीव्र आंदोलन छेडतील. होणार्या परिणामास सर्वस्वी जबाबदार प्रशासनच राहिल .याची नोंद घ्यावी. अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी अशी मागणी शासनाकडे करत आंदोलनाचाही इशारा दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button