Amalner: रणधुमाळी 2024: प्रशासन तैनात..250 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग तर 22 केंद्रांवर Micro observer.. उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती…
अमळनेर विधानसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे.या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी नितीन मुंडावरे यांनी मतदान पुर्वीची तयारी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन मतदान प्रक्रिये दरम्यान लागणारे साहित्य, कर्मचारी, एकूण मतदार, सेन्सिटिव्ह मतदान केंद्रे याशिवाय पोस्टल मतदान, होम मतदान इ संदर्भात माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेर विधानसभा मतदारसंघात एकूण एकुण मतदार 308272 मतदार असून यात पुरुष 157805, स्त्री – 150464 ,तृतीय पंथ – 3 यांचा समावेश आहे. एकूण 325 मतदान केंद्रे असून यात अमळनेर तालुक्यातील 273 व पारोळा-52 तालुक्यातील मतदान केंद्र आहेत. यात धाबे हे क्रिटिकल मतदान केंद्र आहे.
अमळनेर मतदार संघासाठी 325 पथक नेमण्यात आलेले असुन 33 राखीव पथक नेमण्यात आलेले आहेत. 2) त्यासाठी खालीलप्रमाणे कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. यात PRO 355, FPO-355, OPO-MALE-359 OPO-FEMAL-349, Peon 358
FEMALE BOOTH कर्मचारी संख्या – 15
PWD BOOTH कर्मचारी संख्या – 22 Total कर्मचारी संख्या – 1813
सेक्टर अधिकारी 34 + 4 (राखीव) एकुण 38 मतदानासाठी एकुण 15 अधिकारी 345 पोलोस, 250 होमगार्ड (मध्यप्रदेश मधील होमगार्ड यांचा यात समावेश आहे.) 19 ITPB चे हाफ सेक्शन, 1 SRP प्लाटुन, 2 ERT (अत्यावश्यक पथक), 10 पोलीस सेक्टर पेट्रोलींग इतके पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्तीवर आहेत. एक मतदान केंद्राच्या ठिकाणी 1 पोलीस व होमगार्ड दोन मतदान केंद्राच्या ठिकाणी 2 पोलीस व 1 होमगार्ड तीन मतदान केंद्राच्या ठिकाणी 2 पोलीस व 2 होमगार्ड चार मतदान केंद्राच्या ठिकाणी 4 पोलीस व 4 होमगार्ड तसेच 34 सेक्टर अधिकारी यांच्यासाठी 34 पोलीस तैनात असतील.
अमळनेर विधानसभा मतदार संघातील Voter Slip BLO यांना वाटप करण्यासाठी देण्यात आलेले असुन एकुण 94.80% Voter Slip चे वाटप झालेली आहे.
एकुण 22 लॉट प्राप्त झालेले असुन शेवटचा लॉट एकुण 2107 EPIC मतदार ओळखपत्र दिनांक 15/11/2024 रोजी पोस्ट ऑफीस अमळनेर येथे जमा करण्यात आलेले आहेत. दिनांक 18/11/2024 अखेर 1099 पोस्टल बॅलेट प्राप्त झालेले असुन त्यापैकी 720 इतके मतदान झालेले आहे.
त्याच प्रमाणे अमळनेर विधानसभा मतदार संघातील 85+दिव्यांग मतदारांसाठी गृह भेटी मतदानासाठी 190 अर्ज प्राप्त झालेले होते त्यापैकी पहिला टप्पा 8 व 9 नोव्हेंबर ला व दुसरा टप्पा 14 व 15 नोव्हेंबर ला झाले असुन त्यातुन 182 मतदान झालेले आहे.
ETPBS 928 डॉऊनलोड झाले असुन आज अखेर 92 प्राप्त झाले आहेत.
मतदानाच्या दिवशी 250 मतदान केंद्रावर वेब कास्टींग करण्यात येणार आहे. तसेच 22 मतदान केंद्राच्या Location वर वेब कास्टींग कॅमेरा बसविण्यात येणार असुन या 22 मतदान Location वर 75 मतदान केंद्र असुन त्यावर Micro observer यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मतदान दिवसासाठी एकुण रुट 60 असुन त्यासाठी 40 बसेस, 29 क्रुझर व 24 जीप अशा वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दिनांक 20/11/2024 होणाऱ्या मतदानासाठी साहित्य वाटप दिनांक 19/11/2024 रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ परिसर, टाकरखेडा रोड अमळनेर येथे होणार आहे. त्याच प्रमाणे त्याच ठिकाणी साहित्य स्विकृती दि. 20/11/2024 रोजी होणार आहे.
मतमोजणी करता कर्मचारी यांचे दिनांक 23/11/2024 रोजी होणाऱ्या मतमोजणी करीता पहिले प्रशिक्षण गंगाराम सखाराम हायस्कुल, अमळनेर येथे दिनांक 17/11/2024 रोजी दुपारी 4.00 वाजता घेण्यात आले आहे. टेबल निहाय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
14 Thematic मतदान केंद्र एकुण Thematic मतदान केंद्र 11 असुन
महिला मतदान केंद्र – 3 आहेत.
1. महिला केंद्र क्र. 146 एन टी मुंदडा ग्लोबल इंग्लीश स्कुल
2. म. केंद्र. क्र. 147 – नगरपालीका वसुली विभाग, अमळनेर
3. म. केंद्र क्र. 165 – द्रौ. रा. कन्या शाळा अमळनेर
युवा मतदान केंद्र -1
1. म. केंद्र क्र. 169 – सरस्वती विद्या मंदीर, अमळनेर
दिव्यांग मतदान केंद्र – 2
1. म. केंद्र क्र. 174- साने गुरुजी माध्य. विद्यालय अमळनेर
2. म. केंद्र क्र. 182 – गंगाराम सखाराम हायस्कुल अमळनेर
आदर्श मतदान केंद्र – 5
1.म. केंद्र क्र. 180 – – गोल्डन विंग्स स्कुल अमळनेर
2.म. केंद्र क्र. 184 – लोकमान्य शिक्षण मंडळ नविन मराठी शाळा अमळनेर
3. म. केंद्र क्र. 222 – जि.प. प्राथमीक मुलांची शाळा, मंगरुळ
4. म. केंद्र क्र. 27 – जि.प. मराठी मुलांची शाळा, कळमसरे
5. म. केंद्र क्र. 216 – जि.प. प्राथ. शाळा, जवखेडे
विप्रो कंपनी मतदान केंद्रावर मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 350 चार्जिंग बल्ब आज उपविभागीय अधिकारी यांच्या कडे सुपूर्त केले.
मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्या मोबाईलवर चक्रीका ॲप डॉऊनलोड करण्याबाबत आदेश प्राप्त झाले असुन त्यानुसार सर्वांना तश्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. चक्रीका ॲप हे GPS सारखे कामकाज करणार आहे. त्यामुळे मतदान नियुक्त कर्मचारी यांची हालचाल समजण्यास मदत होणार आहे.
या मतदार संघात 2349 मतदार आहेत. त्यांना मतदान केंद्रा पर्यंत घेऊन जाण्यासाठी स्वंयसेवक म्हणुन Nss व NCC चे विद्यार्थी यांची केंद्र निहाय नेमणुक करण्यात आली आहे. 118 ग्रामपंचायतीने प्रत्येकी एक व नगरपालीका यांनी 34 व्हील चेअर्स घेतलेल्या आहेत. सदर व्हील चेअर्स चा वापर दिव्यांग मतदारांसाठी होणार आहे.
स्तनदा माता व लहान बालके यांना सांभाळण्यासाठी अंगणवाडी सेवीका व आशाताई यांची प्रत्येक मतदान केंद्र निहाय नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदान केंद्रावर साफसफाई मोहिम घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व मतदान केंद्रावर मेडीकल किट उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पडवी नसलेल्या मतदान केंद्रावर मंडप टाकण्याचे निर्देश | देण्यात आलेले आहेत.
प्रशासन मतदानासाठी सज्ज झालेले आहे.
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.






