अडावद आरोग्य केंद्राद्वारे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन व डेंग्यू जनजागृती अभियान.
अडावद प्रतिनिधी
आज “राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन” तसेच “डेंग्यू जनजागृती” कार्यक्रमांतर्गत..आरोग्य उपकेंद्र-अडावद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सार्वजनिक खाजगी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थीची कुष्ठरोग आजारविषयी तपासणी करून कुष्ठरोगाविषयी सखोल माहिती सांगण्यात आली, तसेच डेंगू-चिकूनगुनिया-मलेरिया बाबत जलजन्य आजाराबाबत सविस्तर मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली. प्रसंगी तालुका हिवताप पर्यवेक्षक-एम.सी.जाधव, आरोग्य साहाय्यक-पि.एस.लोखंडे, प्रकाश पारधी, आरोग्य सेवक-सुधीर चौधरी, विजय देशमुख, आरोग्य सेविका-निवेदिता शुक्ल,गटप्रवर्तक-श्रीमती-संध्या बोरसे,श्रीमती.शालुबाई सोनवणे, आदींनी परिश्रम घेतले.







