Mumbai

राज्यात वाढला थंडीचा कडाका मुंबईत यावर्षीच्या हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची झाली नोंद..

राज्यात वाढला थंडीचा कडाका मुंबईत यावर्षीच्या हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची झाली नोंद..

प्रशांत नेटके मुंबई

Mumbai : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. दिवाळीनंतर गुलाबी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर आता तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाची घट पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे.

पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर यांसह इतर अनेक जिल्ह्यात किमान सरासरी तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 10 अंशावर घसरला आहे. त्यामुळे पहाटे हवेत गारवा जाणवू लागला आहे. तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर, मफलर, कानटोप्या त्याशिवाय शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

दरम्यान राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही तापमानाचा पारा घसरला आहे. सांताक्रुझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे मुंबईतील यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे.

राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)

नाशिक – 11.1°C
परभणी – 10.6°C
परभणी अॅग्री युनिव्हर्सिटी – 8.8°C
पुणे – 11.5°C
सांताक्रुझ – 18.4°C (यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान)
जळगाव – 12.6°C
बारामती – 11.9 °C
औरंगाबाद – 13.0°C
गोंदिया – 10.5°C
नागपूर – 12.4°C

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button