Breaking: 1 एप्रिल पासून सामान्य जनतेच्या खिशावर पडणार ताण..! वाचा काय होईल महाग..?
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक मोठे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामधील अनेक बदल हे तुमच्या आर्थिक परिस्थितीला प्रभावित करतात. दोन दिवसांनंतर एप्रिल महिना सुरु होते. नवीन महिना असण्यासोबतच नवीन आर्थिक वर्ष देखील सुरु होतंय. म्हणजेच 2023-2024 हे आर्थिक वर्ष सुरु होतंय. यामुळे बदलांची यादी ही मोठी आहे. 1 एप्रिलपासून सिलेंडरच्या किंमतींमध्ये मोठे बदल होऊ शकतात. यासोबतच सोन्याच्या विक्रीविषयीही नवीन नियम लागू होणार आहोत. याविषयी सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
गॅस च्या किंमती वाढणार
सरकारी गॅस कंपन्या दरमहिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमतींमध्ये बदल करतात आणि नवीन रेट जारी केले जातात. मार्च महिन्याच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ झाल्याने एलपीजी ग्राहक हैराण झाले होते. येत्या 1 तारखेला देखील या किंमतींमध्ये बदल होऊ शकतात. एलपीजीसोबतच सीएनजी-पीएनजीच्या किमतींमध्येही बदल होऊ शकतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्ट्सनुसार, सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढण्याची शक्यता कायम आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही बदल दिसून येतो.
सोन्यावर हॉल मार्क
सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीशी संबंधित नियम 1 एप्रिलपासून बदलणार आहे. ग्राहक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन नियमानुसार, 31 मार्च 2023 नंतर, 4-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन असलेल्या दागिन्यांच्या विक्रीवर बंदी घातली जाईल. 1 एप्रिल 2023 पासून केवळ 6-अंकी हॉलमार्क HUID दागिने विकले जातील. मात्र ग्राहक त्यांचे जुने दागिने हॉलमार्किंगशिवाय विकू शकतील.
अधिक विमा हप्त्यावर कर
2023 च्या अर्थसंकल्पात, हाय प्रीमियमच्या इंन्शुरन्समुळे होणाऱ्या कमाईवर टॅक्सची घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत, जर तुमच्या विम्याचा वार्षिक हप्ता 5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जाईल. आतापर्यंत इन्शुरन्सचे रेग्युलर उत्पन्न पूर्णपणे टॅक्स फ्री होते. याचा फायदा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सला मिळत होता. हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे.
सोन्यावर कर
एप्रिलच्या सुरूवातीस, तुम्हाला फिजिकल गोल्डला ई-गोल्ड किंवा ई-गोल्डचे फिजिकल गोल्डमध्ये रूपांतर करण्यावर कोणताही कॅपिटल गेन टक्स भरावा लागणार नाही. कॅपिटल गेन टॅक्सपासून मुक्ती देण्याची घोषणाही अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली होती. मात्र जर तुम्ही कन्वर्जननंतर हे गोल्ड विकले तर तुम्हाला LTCG च्या नियमांनुसार टॅक्स द्यावा लागेल.
कार होणार महाग
नवीन आर्थिक वर्षात आणखी एक बदल होणार आहे. तो म्हणजे लक्झरी कार खरेदी करणं महागणार आहे. देशात बीएस-6 चा पहिला टप्पा संपणार आहे आणि दुसरा टप्पा सुरू होणार आहे. या अंतर्गत, नवीन नियमांनुसार कार अपडेट करण्यासाठी झालेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी ऑटो कंपन्या ग्राहकांवर बोजा वाढवू शकतात. यामुळे 1 एप्रिलनंतर कार खरेदी करणे महागात पडू शकते.
बँकांना सुट्ट्या
एप्रिलमध्ये बँकिंग सुट्ट्या भरपूर असतील. 16 दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. यामध्ये रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. मात्र, या सुट्यांमध्ये तुम्ही ऑनलाइन बँकिंगचे काम करू शकता.
दिव्यांगासाठी विशिष्ट ओळखपत्र
दिव्यांगासाठी 17 सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. पण त्यासाठी 1 एप्रिलपासून ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. दिव्यांगांना आता हे विशिष्ट ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे हे ओळखपत्र नाही, त्यांनी आधार कार्डचा क्रमांक द्यावा लागेल. तुम्हाला हे ओळखपत्र काढण्यासाठी www.swavlambancard.gov.in या ठिकाणी जाऊन दिव्यांग ओळखपत्रासाठी अर्ज करावा लागेल .
नवीन कर व्यवस्था लागू
केंद्र सरकार नवीन कर व्यवस्था (New Tax Regime) 1 एप्रिलपासून लागू होईल. नवीन कर व्यवस्थेत केंद्र सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. अर्थसंकल्प 2023 मध्ये 7 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. करदात्यांनी जुनी कर व्यवस्था निवडली तर त्यांना या सवलतीवर पाणी सोडावे लागेल. 1 एप्रिलपासून हा नियम लागू होईल.
इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल
नवीन कर व्यवस्थातंर्गत कर रचनेत 0 ते 3 लाख रुपयांवर शून्य, 3 ते 6 लाखांवर 5 टक्के, 6 ते 9 लाख रुपयांवर 10 टक्के, 9 ते12 लाखांवर 15 टक्के आणि 15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के सवलत मिळेल. एलटीए मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी नसणाऱ्यांना लिव्ह इनकॅशमेंट 2002 नुसार, 3 लाख रुपये होती. त्यात आता भरघोस वाढ करुन 25 लाख करण्यात आली आहे.
नवीन कर व्यवस्था लागू
केंद्र सरकार नवीन कर व्यवस्था (New Tax Regime) 1 एप्रिलपासून लागू होईल. नवीन कर व्यवस्थेत केंद्र सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. अर्थसंकल्प 2023 मध्ये 7 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. करदात्यांनी जुनी कर व्यवस्था निवडली तर त्यांना या सवलतीवर पाणी सोडावे लागेल. 1 एप्रिलपासून हा नियम लागू होईल.
इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल
नवीन कर व्यवस्थातंर्गत कर रचनेत 0 ते 3 लाख रुपयांवर शून्य, 3 ते 6 लाखांवर 5 टक्के, 6 ते 9 लाख रुपयांवर 10 टक्के, 9 ते12 लाखांवर 15 टक्के आणि 15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के सवलत मिळेल. एलटीए मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी नसणाऱ्यांना लिव्ह इनकॅशमेंट 2002 नुसार, 3 लाख रुपये होती. त्यात आता भरघोस वाढ करुन 25 लाख करण्यात आली आहे.
डेट फंडवर कर सवलत नाही
सध्याच्या काळात डेट फंडमध्ये गुंतवणूकदारांना फिक्स डिपॉझिटचा कर फायदा मिळतो. जर कोणी डेट फंडमध्ये 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवल्यास, इंडेक्सेशन बेनिफिटसह 20% लॉन्ग टर्म कॅपिटल गेन कर लावल्या जातो. वास्ताविक, फिक्स्ड डिपॉझिटवर मिळत असलेले व्याज टॅक्स स्लॅबनुसार मिळते. प्रस्तावानुसार, तीन वर्षांपेक्षा जास्त काळपर्यंत डेट फंडाच्या इंडेक्सेशनचा लाभ मिळणार नाही आणि तुम्ही 20% टॅक्स बेनिफिटसाठी पात्र नसाल.






