Maharashtra

एच पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. अशोक खैरनार यांचे निधन

एच पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. अशोक खैरनार यांचे निधन

प्रतिनिधी पी व्ही आनंद

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. अशोक खैरनार (वय ५७) यांचे मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात्‌ पत्नी, दोन मुले, सून तसेच एक भाऊ, दोन बहिणी व मोठा आप्त परिवार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील २४ प्रशासकीय विभागांपैकी एच/पूर्व या विभागात रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा कालावधी १३४ दिवसांवर पोहोचलेला आहे आणि येथील रूग्ण वाढीचा सरासरी दरही ०.५ % असा मुंबईतच नाही तर कदाचित देशात देखील सर्वोत्तम आहे. अशी कामगिरी करणारा हा पहिला विभाग ठरला होता. म्हणजेच रुग्णांची वाढ ही अत्यंत कमी करण्यात यश आले होते. या प्रयत्नांमध्ये श्री. खैरनार यांचा मोठा वाटा होता.

धुळे महानगरपालिका हद्दीतील मोहाडीचे मूळ रहिवासी असलेले श्री. खैरनार यांचे शालेय शिक्षण मोहाडीमध्येच झाले होते. विद्युत शाखेतील पदविका शिक्षण त्यांनी धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर मुंबईतील व्ही. जे. टी. आय. महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीय पदवी आणि ‘आय. आय. टी. पवई’ या सुविख्यात संस्थेतून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. श्री. खैरनार हे फेब्रुवारी १९८८ पासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते. जानेवारी २०१८ पासून ते सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते. ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त असताना, महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या विशेष कामगिरीचा गौरव म्हणून श्री. अशोक खैरनार यांना तत्कालिन महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांच्या हस्ते ‘जानेवारी २०१९’ साठी ‘ऑफीसर ऑफ द मंथ’ या बहुमानाने विशेष सन्मानित करण्यात आले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button