Rawer

कोरोना महाभयंकर काळात पोलिस पाटील, सरपंच पद रिक्त ठोस उपाययोजना, कोरोना बचाव समिती अभावी बेशिस्तीमुळे मोठा वाघोदा वासियांचे जीव धोक्यात ग्रामपंचायतचे कर्मचारीही लसीकरणाच्या प्रतिक्षेत

कोरोना महाभयंकर काळात पोलिस पाटील, सरपंच पद रिक्त ठोस उपाययोजना, कोरोना बचाव समिती अभावी बेशिस्तीमुळे मोठा वाघोदा वासियांचे जीव धोक्यात
ग्रामपंचायतचे कर्मचारीही लसीकरणाच्या प्रतिक्षेत

मुबारक तडवी रावेर

रावेर : गावाच्या अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिनावल गावात कोरोना प्रादुर्भावाने थैमान घातलेले असून गांव हॉटस्पॉट यादीत समाविष्ट झालेले आहे शेजारच्या गावात कोरोना संक्रमणाचा हाहाकार माजला असतांनाच मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अपात्र झाले असल्याने व कोरोना योध्दा पोलिस पाटील यांचा स्वर्गवास झाल्यामुळे हे दोन्ही महत्त्वाच्या पदांवर कार्यरत पदस्थ व्यक्ती नाही त्यामुळे मोठा वाघोदा गावात कोरोना संक्रमणाचा उद्रेक होण्याची दाट शक्यता ही नाकारता येत नाही तसेच शासनाने जारी केलेल्या कोरोना प्रतिबंधासह कडक निर्बंध व नियमावली चे काटेकोर पालन व अंमलबजावणी केली जात नसल्याचे स्पष्ट चित्र सध्यातरी पाहावयास मिळत आहे यासह ग्रामपंचायत चे,कार्यालयीन आरोग्य,सफाई, पाणी पुरवठा कर्मचारी कोरोना लसीकरणापासून वंचित आहेत तरी प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन भविष्यात मोठा वाघोदा गावात कोरोना संक्रमणाचा उद्रेक होणार नाही याकरिता शासनाने जातीने लक्ष केंद्रित करून निराकरणासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी मोठा वाघोदा येथील रहिवासी तथा ग्रामस्थांतून केली जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button