Amalner

Amalner:ग्रामीण रुग्णालयात निघालेल्या सर्पाला गणेश शिंगारे यांनी दिले जीवदान…

Amalner:ग्रामीण रुग्णालयात निघालेल्या सर्पाला गणेश शिंगारे यांनी दिले जीवदान…

अमळनेर : पावसाळा सुरु झाला असून सर्प दिसू शकतात.सर्पांचा वावर सुरू झाला आहे. अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात तब्बल ८ फुटाचा धामण जातीचा सर्प निघाला आणि एकच तारांबळ उडाली. तेथील कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र तथा नगर परिषदचे कर्मचारी गणेश शिंगारे यांना बोलवून घेतले.शिंगारे यांनी कौशल्याने सर्पाला पकडुन सुरक्षित ठिकाणी सोडून दिले.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सर्प बाहेर येतात.त्यांना मनुष्यप्राण्यांचा धोका वाटल्यानंतर दंश करतात.दरवर्षी सर्पदंशाने शेकडो लोकांना प्राण गमवावे लागतात.

पावसाळ्यात सर्प निघतात अश्या वेळी सर्पमित्र गणेश शिंगारे यांना ९७६७६७३७४७ या नंबरवर संपर्क साधावा, जेणेकरुन सर्पाचे आपलेही नगर जणांना प्राण गमवावे प्राण वाचतिल, आणि संभाव्य धोका टळेल.
आजपर्यंत गणेश शिंगारे यांनी असंख्य सर्प दंश झालेल्याचे प्राण वाचविले असून सर्प पकडून सर्वांचेही प्राणप वाचविले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button