Maharashtra

अवैध वाळू वाहतूकीवर सुस्त महसूल विभागाचा वरदहस्त..पालक,विद्यार्थी त्रस्त…

ठेका रुंधाटीचा, अन वाळू वाहतुक दापोरी खुर्द. येथून! 
अवैध वाळू वाहतूकीवर सुस्त महसूल विभागाचा वरदहस्त..पालक,विद्यार्थी त्रस्त…

अवैध वाळू वाहतूकीवर सुस्त महसूल विभागाचा वरदहस्त..पालक,विद्यार्थी त्रस्त...

 अमळनेर प्रतिनिधी
            येथुन जवळच असलेल्या रुंधाटी येथील तापी नदीपात्राचा वाळू ठेका दिला असुन त्यांना वाहतुकीसाठी तापी नदीपात्रातुनच मुंगसे सावखेडा तापीपुला वर रस्ता दिलेला आहे .व तेथून तापी काठी पुलाजवळ सावखेडा ग्रां .पं. हद्दीत येथे वाळूचा साठा करण्यात येत आहेत .

अवैध वाळू वाहतूकीवर सुस्त महसूल विभागाचा वरदहस्त..पालक,विद्यार्थी त्रस्त...

       गेल्या दहा ते पंधरा दिवसापासुन दापोरी खुर्द येथील तापी नदीपात्रातुन 
रात्रं -दिवस ट्रक्टरद्वारे अवैध वाळू वहातुक सर्रासपणे सुरू आहे.
सदरची दहा ते पंधरा ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक  मुंगसे सावखेडा मार्गे सुरू असुन त्यांची जोरात वर्दळ सुरू आहे . सकाळीअंगणवाडी व जि.प. मराठी,शाळाआणि सावखेडा हायस्कुल मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला जिव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. यामुळे लहान -लहान बालकांचा जिव धोक्यात आला आहे तसेच अपघात होण्याची शक्यता आहे.
    या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यांत यावी अशी मागणी  मुंगसे व दापोरी खुर्द ग्रामस्थ व पालक, विद्यार्थी वर्गाकडून केली जात आहे. याकडे मात्र महसुल विभागाने गेल्या पंधरा दिवसापासुन सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहें.
अवैध वाळू वहातुक थांबवून शाळकरी विद्यार्थांचा धोक्यात  आलेला जिव वाचवून होणारे नुकसान थांबवावे.
अशी मागणी परिसरातुन करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button