चाकुर:-क्रेडीट अॕक्सेस ग्रामीण लि.(ग्रामीण कुटा) फायनान्स च्या वतीने मास्क व सॕनिटायझरचे वाटप
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकुर येथील क्रेडीट अॕक्सेस ग्रामीण लि.(ग्रामीण कुटा) फायनान्सच्या वतीने मास्क व सॕनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले.
तहसील, पोलिस ठाणे, व आरोग्य विभाग चाकुर या कार्यालयातील कर्मचा-यांना कोरोना किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी चाकूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.जयवंतराव चव्हाण साहेब, चाकुर चे तहसीलदार श्री.शिवानंद बिडवे साहेब, तसेच चाकुर चे वैद्यकीय अधिकारी श्री. डि. के.सावंत साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. अपराध रब्बानी, व चाकूर शाखेचे शाखाधिकारी श्री. कृष्णा कंधारे व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड शाखा चाकूर च्या वतीने सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले.






